महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Cyrus Poonawala : सिरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक सायरस पूनावाला यांना पद्मभूषण जाहीर, नोबेलसाठीही झाले होते नामांकन

सायरस पूनावाला हे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक ( Serum Institute of India MD ) आहेत.  घोड्यांच्या शर्यतीची आवड असलेल्या एका पारशी कुटुंबात सायरस यांचा जन्म झाला. पुण्याच्या बिशप स्कूलमधून त्यांनी शिक्षण घेतले. पुणे विद्यापीठातून १९६६ साली ते पदवीधर झाले.

सायरस पूनावाला
सायरस पूनावाला

By

Published : Jan 25, 2022, 9:58 PM IST

Updated : Jan 25, 2022, 10:06 PM IST

पुणे - प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 2022 मधील पद्म पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात सिरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक सायरस पूनावाला ( founder Serum Institute of India) यांची पद्मभूषण नावासाठी घोषणा ( Padma Bhushan to cyrus poonawala ) करण्यात आली आहे. सायरस पूनावाला यांच्याविषयी जाणून घेऊया.


पूनावाला यांना आजही घोडे शर्यतीची प्रचंड आवड

सायरस पूनावाला हे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक आहेत. घोड्यांच्या शर्यतीची आवड (Horse racing in Pune ) असलेल्या एका पारशी कुटुंबात सायरस यांचा जन्म झाला. पुण्याच्या बिशप स्कूलमधून त्यांनी शिक्षण घेतले. पुणे विद्यापीठातून १९६६ साली ते पदवीधर झाले. सायरस यांचे वडील आणि भाऊ घोड्यांना शर्यतींसाठी तयार करत असत. त्यांनी हडपसर येथे देशातील पहिला स्टड फार्म ( horse stud farm in Pune ) सुरू केला. वयाच्या अठराव्या वर्षी सायरस यांनीही वडिलांच्या व्यवसायात हातभार लावण्यास सुरुवात केली. त्यांना आजही घोडे शर्यतीची प्रचंड आवड आहे. काही वर्षांपूर्वी त्यांना पॅरीसमध्ये एक घोडा आवडला. त्यांनी त्यावर चक्क ७.५ कोटीची बोली लावली होती. ते विदेशातही घोड्यांच्या शर्यतींमध्ये भाग घेतात. त्यांचे स्टड फार्म जगप्रसिद्ध आहेच. मात्र, खास घोडे शर्यतीसाठी त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची परवानगी घेऊन खास कंपनी स्थापन केली आहे.

हेही वाचा-Mumbai Corona Update : मुंबईत सलग दुसऱ्या दिवशीही कोरोना रुग्णसंख्येत घट, १० जणांचा मृत्यू

सायरस पूनावाला हे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक

देशातील सर्वाधिक श्रीमंतांच्या पहिल्या दहामध्ये सायरस पुनावाला यांचा समावेश आहे. मुंबईतील तब्बल ७५० कोटी रुपये किमतीच्या घरात राहणारे उद्योजक, अश्वशर्यतीतील देशातील बडे नाव, सिरम इन्स्टिट्यूट या देशातील सर्वात मोठ्या लस उत्पादन करणाऱ्या कंपनीचे संस्थापक-अध्यक्ष, आलिशान मोटारींचा ताफा बाळगणारे उद्योगपती यापलीकडेही पुनावाला यांची ओळख आहे. डॉ. सायरस पूनावाला यांनी सामाजिक कार्यातही ( Social work of Cyrus Poonawala ) आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. जगविख्यात नोबेल पुरस्कारासाठी त्यांचे नामांकन झाले. यामधून डॉ. पूनावाला यांच्या कामाचे वेगळेपण पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. उद्योग व्यवसायातील यशानंतर प्रचंड संपत्ती मिळविल्यावर सामाजिक क्षेत्रासाठी योगदान डॉ. सायरस पूनावालांनी नेहमीच योगदान दिले आहे.

हेही वाचा-Maharashtra Corona Update : राज्यात मंगळवारी 33 हजार 914 नवीन कोरोनाबाधित; ओमायक्रॉनचे 13 नवे रुग्ण

जगातील प्रत्येक दुसऱ्या लहान मुलाला ‘सिरम’ची लस
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही रोगप्रतिकारक औषधे निर्माण करणारी कंपनी आहे. औषध निर्माण करणारी जगातली सर्वोत्तम कंपनी म्हणून ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ला नावाजले जाते. व्यावसायिक सायरस पूनावाला यांनी पुण्यातील हडपसर भागात १९६६ साली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना केली. सध्या त्यांच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनीचा कारभार त्यांचा मुलगा अदार पूनावाला हे पाहत आहेत. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने सर्वप्रथम धनुर्वात बरा करणाऱ्या औषधाचा शोध लावला. धनुर्वातावर औषध निर्माण करणारी ही देशातील पहिली कंपनी ठरली. त्यानंतर १९७४ साली कंपनीने डीटीपी लस शोधली. या लसीकरणामुळे धनुर्वात, घटसर्प आणि खोकला बरा होतो. तसेच १९८१ साली सर्पदंश आणि १९८९ साली गोवरीवरील लसीकरणाचा शोध या कंपनीने लावला. म्हणजेच बरा न होऊ शकणाऱ्या अनेक आजारांवर या कंपनीने औषधे शोधली आहेत. सध्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही १.५ अब्जहून अधिक औषधांची निर्मिती करणारी देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. या कंपनीतून १००हून अधिक देशांना औषध पुरवले जाते. जगातील प्रत्येक दुसऱ्या लहान मुलाला ‘सिरम’ची लस दिली जाते. त्यामधून सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे महत्त्व लक्षात येऊ शकते.

हेही वाचा-Padma Awards 2022 : पद्म पुरस्कारांची घोषणा.. १२८ जणांना यंदा पद्म पुरस्कार, महाराष्ट्रातून..

पूर्ण कुटुंबच सामाजिक बांधिलकी मानणारे

लस उत्पादनाच्या क्षेत्रात काम करत असतानाच विविध क्षेत्रांत डॉ. सायरस पूनावाला यांची समाजोपयोगी कामे सुरू असतात. अनेक संस्थांचे ते आश्रयदाते आहेत. विशेष म्हणजे त्यांचे संपूर्ण कुटुंबच सामाजिक बांधिलकी मानणारे आहे. मुलगा आदर पूनावाला यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या फाउंडेशनच्या माध्यमातून स्वच्छ भारत मिशन प्रकल्पांतर्गत 'पूनावाला क्लीन सिटी' हा प्रकल्प तब्बल शंभर कोटी रुपये खर्च करून राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केले आहे. भारत सरकाने त्यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला आहे. डॉ. पूनावाला यांना अमेरिकेतील बोस्टन येथील जगविख्यात मॅसेच्युसेट्स विद्यापीठाच्या (बोस्टन) मेडिकल स्कूलतर्फे ‘ऑनररी डॉक्टर ऑफ ह्युमन लेटर्स या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. 'जगातील सर्वात प्रभावी सात व्हॅक्सिन अग्रणींपैकी एक' अशा शब्दात बिल गेट्स यांनी पूनावाला यांची ओळख करून दिली आहे.

Last Updated : Jan 25, 2022, 10:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details