पुणे- राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा निर्माण होण्याचे कारणच नसताना भाजप गुंता वाढवत असून, अमित शाह यांच्यामुळेच हा गुंता वाढला आहे. भाजपने बाजूला केलेल्या नितीन गडकरी यांना मध्यस्थीसाठी बोलवले तर, ते 2 तासात हा तिढा सोडवतील, असे पत्र शिवसेनेचे नेते किशोर तिवारी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांना लिहिले आहे.
किशोर तिवारी यांच्यासोबत बातचीत केली आहे पुण्याचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी... हेही वाचा -राष्ट्रपती राजवट म्हणजे काय? राज्यपालांची भूमिका ठरते महत्त्वाची
उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करावे, तेच त्या पदासाठी लायक आहेत. सत्ता संघर्षात नितीन गडकरी यांनी मध्यस्थी करावी, अमित शाहांच्या एकाधिकारशाहीमुळे युतीत तिढा निर्माण झाला आहे, संजय राऊत जे बोलतात ते खरे आहे. सेनेला दिलेला शब्द भाजपने पाळावा, असे किशोर तिवारी यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा -'देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री, महायुती करणार सत्ता स्थापन'