पुणे -देशातील सर्व राज्यातील पोलीस दलाचे सक्षमीकरण करण्यावर केंद्र सरकार लक्ष देत आहे. त्यासाठी केंद्र सरकार कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही." असे केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी रविवारी सांगितले. "समाजासमोर पोलिसांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने सादर केली जाते, हे चित्र बदलण्याचा प्रयत्न केला जाईल" असेही रेड्डी यांनी सांगितले.
पोलिसांची समाजासमोर बनलेली चुकीची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करू - केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी
पाषाण येथील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेमध्ये (आयसर) आयोजित केलेल्या तीन दिवसीय वार्षिक पोलीस महासंचालक परिषदेचा रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत समारोप झाला.
केंद्रीय गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी
पाषाण येथील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेमध्ये (आयसर) आयोजित केलेल्या तीन दिवसीय वार्षिक पोलीस महासंचालक परिषदेचा रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत समारोप झाला. या परिषदेनंतर रेड्डी यांनी पोलिस संशोधन केंद्र येथील हुतात्मा स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले.