महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Kirit Somaiya : गिरीश भाऊ, अनिल देशमुखच्या शेजारची कोठडी साफ करून ठेवायला सांगा: किरीट सोमय्या - PUNE Kirit LIVE

किरीट सोमय्या पुणे महापालिकेत दाखल
किरीट सोमय्या पुणे महापालिकेत दाखल

By

Published : Feb 11, 2022, 5:00 PM IST

Updated : Feb 11, 2022, 10:57 PM IST

18:35 February 11

संजय राऊत - पाटकरांचे संबंध काय?

  • उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करावाच लागणार आहे, असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे.
  • राऊतांनी मुलीच्या लग्नातील डेकोरेटरला चौकशीला बोलावलं म्हणून सांगितलं?
  • मी त्यांचं नाव घेतल नव्हतं.
  • आता त्यांना हिशेब द्यावा लागणार आहे.
  • संजय राऊत सांगा कोणकोणत्या हॉटेलमध्ये मुलीच्या लग्नाचे कार्यक्रम घेतले?
  • प्रवीण राऊत ईडीला काय काय सांगतो याची भीती संजय राऊतांना आहे.
  • संजय राऊतचा एक पंटर जेलमध्ये गेला तर ही हालत आहे.
  • दुसरा पार्टनर जेलमध्ये गेला तर तेरा क्या होगा ...?
  • गिरीश भाऊ अनिल देशमुखच्या शेजारची कोठडी साफ करून ठेवायला सांगा.

18:30 February 11

किरीट सोमय्या पत्रकार परिषद

किरीट सोमय्या यांची पुण्यात पत्रकार परिषद

  • ठाकरे सरकारने कोविड सेंटरला भ्रष्टाचाराचं साधन बनवलं.
  • ज्या लोकांचा जीव गेला त्यांच्या परिवारांची मी माफी मागतो
  • संजय राऊतांनी त्या कंपनीला काँट्रॅक्ट दिल नसतं तर त्या लोकांचा जीव वाचला असता.
  • भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही लढतोय यामुळे काँग्रेस नेत्यांच्या भावना दुखावल्या.
  • काँग्रेसचं आर्थिक नुकसान झालं म्हणून मी माफी मागतो.
  • उद्धव ठाकरे, संजय राऊत, अजित पवार काय करताहेत?
  • कोविड सेंटरच्या कंपन्यांचे मालक कोण?
  • चहा विकणाऱ्याच्या नावावर कोविड सेंटरचं कंत्राट दिल
  • उद्धव ठाकरेंना माहित नाही राज्याच्या १२ कोटी जनतेचा किरीट सोमय्याला आशीर्वाद

18:25 February 11

पुणे महापालिकेच्या पायऱ्यांवर काँग्रेसनं शिंपडलं गोमूत्र

पुणे महापालिकेत भाजप नेते किरीट सोमय्या यांचा पायऱ्यांवर सत्कार करण्यात आला. त्याठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोमूत्र शिंपडलं आहे. सोमय्यांच्या सत्कारामुळे नागरिकांना ताटकळत बाहेर थांबावं लागलं असा आरोप त्यांनी केला आहे.

17:33 February 11

भाजपकडून पुणे महापालिकेत यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन अन् घोषणाबाजी

पुणे महापालिकेत आज पुन्हा राडा झाला आहे. महापालिकेच्या पायऱ्यांवर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

पुणे महापालिकेत आज पुन्हा राडा झाला आहे. महापालिकेच्या पायऱ्यांवर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पुणे महापालिकेचे गेट तोडून भाजप नेते किरीट सोमय्या पुणे महापालिकेत दाखल झाले. भाजपकडून पुणे महापालिकेत यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन अन् घोषणाबाजी करण्यात आली. शिवसैनिकांनी गेल्या शनिवारी पुणे महापालिकेत किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला केला होता. या सर्व घडामोडीत किरीट सोमय्या यांच्या सुरक्षा रक्षकाच्या पायाला दुखापत झाली आहे. सोमय्या हे आयुक्तांना भेटण्यासाठी सोमय्या तिसऱ्या मजल्यावर गेले असून, भेट सुरु आहे.

17:25 February 11

'आता कसं वाटतंय गोड गोड वाटतंय', भाजप कार्यकर्त्यांनी दिल्या घोषणा

पुणे महापालिकेत आज पुन्हा राडा झाला आहे. महापालिकेच्या पायऱ्यांवर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

भाजप नेते किरीट सोमय्या आज पुणे महापालिकेत आले आहेत. सोमय्या यांच्या स्वागतासाठी आलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या विरोधात घोषणाबाजी केली. 'ठाकरे सरकार हाय हाय', 'जिंदाबाद जिंदाबाद, किरीट सोमय्या जिंदाबाद', 'एकच भाई, किरीट भाई', 'आता कसं वाटतंय गोड गोड वाटतंय', अशा प्रकारे भाजप कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या.

17:20 February 11

पुणे महानगरपालिका परिसरात तणावाचे वातावरण

पुणे महापालिकेत आज पुन्हा राडा झाला आहे. महापालिकेच्या पायऱ्यांवर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

पुणे महापालिका परिसरात आज भाजप नेते किरीट सोमय्यांच्या स्वागताला भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. यावेळी गर्दी अनावर झाल्याने पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर करण्यात आला. त्यामुळे परिसरात सध्या तणावाचं वातावरण आहे. भाजपकडून यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं.

17:17 February 11

किरीट सोमय्यांनी घेतली पुणे महापालिका आयुक्तांची भेट

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुणे महापालिका आयुक्तांची भेट घेतली आहे. त्यांच्यासोबत भाजपचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित आहेत. पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप सोमय्या यांच्याकडून करण्यात आला आहे. त्याप्रकरणी ही भेट होत आहे.

17:05 February 11

पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळा

उद्धव ठाकरे पुण्यातील लोकांच्या जीवाशी खेळ केला. संजय राऊत यांची बेनामी कंपनी आहे. पुण्यात घोटाळा केलेल्या कंपनीला मुंबईत चार ठिकाणी कोविड सेंटरचे काँट्रॅक्ट दिले. असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला.

17:02 February 11

परवानगी नाकारल्यानंतरही भाजप कार्यकर्त्यांनी केला सोमय्यांचा सत्कार

भाजप नेते किरीट सोमय्या पुणे महापालिकेत आले होते. त्यांचा सत्कार भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला. या सत्काराला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र परवानगी नाकारल्यानंतरही भाजप कार्यकर्त्यांनी केला सोमय्यांचा सत्कार कार्यकर्त्यांनी केला.

17:00 February 11

कोरोनाकाळात महाविकास आघाडी जनतेच्या जीवाशी खेळत होती : किरीट सोमय्या

कोरोनाकाळात महाविकास आघाडी जनतेच्या जीवाशी खेळत होती असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुण्यात केला. संजय राऊत यांच्या मदतीने त्यांनी खेळ मांडला असा आरोप त्यांनी यावेळी केला.

16:46 February 11

पुणे महापालिकेच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त

पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या हे पुणे महापालिकेत दाखल झाले आहेत. हल्ला झाल्यानंतर पहिल्यांदाच ते पुणे महापालिकेत आले आहेत. ज्या पायऱ्यांवर सोमय्या पडले होते त्याच पायऱ्यांवर सोमय्यांचा सत्कार करणार असल्याचं भाजप कार्यकर्त्यांनी जाहीर केले आहे. मोठ्या प्रमाणावर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेनेच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे. पोलिसांनी सोमय्या यांचा सत्कार करण्यास मनाई केली आहे.

Last Updated : Feb 11, 2022, 10:57 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details