महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

किरण गोसावीच्या अडचणीत वाढ; महिला साथीदार कुसुम गायकवाडला अटक - आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा साक्षीदार

शिवराज जमादार या तरुणाला परदेशात नोकरीचे आमिष दाखवत एक लाख तीस हजार रुपये उकळल्या प्रकरणी किरण गोसावी (Kiran Gosavi) आणि कुसुम गायकवाड (Kusum Gaikwad) यांच्यावर पुण्यातील लष्कर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी लष्कर पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपी कुसुम गायकवाड हिला अटक केली आहे.

Kusum Gaikwad arrested
किरण गोसावीच्या महिला साथीदार कुसुम गायकवाडला अटक

By

Published : Nov 13, 2021, 3:59 AM IST

Updated : Nov 13, 2021, 11:16 AM IST

पुणे (pune) - तरुणांना परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या किरण गोसावीच्या (Kiran Gosavi) अडचणी वाढल्या आहे. फसवणूक प्रकरणातील गोसावीची महिला साथीदार आसलेल्या कुसुम गायकवाडला (Kusum Gaikwad) लष्कर पोलिसांनी केली अटक केली आहे.

कुसुम गायकवाडला लष्कर पोलिसांनी केली अटक -

शिवराज जमादार या तरुणाला परदेशात नोकरीचे आमिष दाखवत एक लाख तीस हजार रुपये उकळल्या प्रकरणी किरण गोसावी आणि कुसुम गायकवाड यांच्यावर पुण्यातील लष्कर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी लष्कर पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपी कुसुम गायकवाड हिला अटक केली आहे. कुसुम गायकवाड ही दुबईहून पुण्यात दाखल झाल्यानंतर लष्कर पोलिसांनी अटक केली आहे.

गोसावीच्या अडचणीत वाढ -

आर्यन खान प्रकरणातील प्रमुख साक्षीदार असलेला किरण गोसावी यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात 2018 मध्ये दाखल गुन्ह्याबाबत किरण गोसावीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर किरण गोसावीकडून नोकरी लावण्याच्या बहाण्याने फसवणूक झाल्याची तक्रार आणखीन चार तरुणांनी पुण्यातील लष्कर पोलीस ठाणे आणि वानवडी पोलीस ठाण्यात दिली होती. राज्यातील विविध शहरांमध्ये देखील गोसावी याच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा -Kiran Gosavi : येरवडा कारागृहातून किरण गोसावीला लष्कर पोलिसांनी घेतले ताब्यात

ड्रग्ज प्रकरणानंतर गोसावी चर्चेत -

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील किरण गोसावीची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये किरण गोसावीने लखनऊ पोलिसांकडे सरेंडर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पुणे पोलिसांचे पथक किरण गोसावीला अटक करण्यासाठी लखनऊला गेले होते. अखेर किरण गोसावीला पुणे पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून न्यायाधीश आर. के. बाफना भळगट यांनी सुरुवातीला 8 दिवसांची नंतर 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर कोठडीत 1 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. आज त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. त्यानंतर त्याला लष्कर पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

कोण आहे गोसावी?

क्रुझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने काही दिवसांपूर्वी अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यनसह अन्य काही जणांना अटक केली होती. या प्रकरणातच गोसावी याला एनसीबीने साक्षीदार बनवले होते. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी यावरून एनसीबीवर जोरदार टीका केली. त्यामुळे गोसावी वादात अडकला. त्यातच त्याच्याविरोधातील काही फसवणुकीचे प्रकरणेही समोर आली आहेत.

काय आहे प्रकरण?

किरण गोसावीवर पुण्यात फरासखाना पोलीस ठाण्यात २०१८ मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पुण्यातील एका तरुणाने तक्रार दिली होती. गोसावी याने आपल्या फेसबुक पेजवर मलेशियात हॉटेलमध्ये नोकरीची संधी अशी पोस्ट टाकली होती. त्याला चिन्मय देशमुख या तरुणाने प्रतिसाद दिला होता. त्याच्याकडून तीन लाख रुपये घेऊन गोसावीने त्या तरुणाला मलेशियाला पाठवले. मात्र, तेथे नोकरी न दिल्याने तो भारतात परत आला होता. त्यानंतर त्याने फरासखाना पोलिसांकडे तक्रार दिली होती. या गुन्ह्यात गोसावी फरार होता. त्यामुळे फरासखाना पोलीस त्याचा शोध घेत होते.

हेही वाचा -Kiran Gosavi : लष्कर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यासाठी गोसावीला 7 दिवसांची पोलीस कोठडी

Last Updated : Nov 13, 2021, 11:16 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details