महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुलीला नेले पळवून; प्रियकरासह दोघांचा मृत्यू - मुलीला नेले पळवून

एका २१ वर्षीय तरुणीला प्रियकराने पळवून नेले असता, मुलीच्या नातेवाईकांनी हॉटेल माणुसकी येथे बोलावून मुलाला बेदम मारहाण केली. यात प्रियकरासह त्याच्या मित्राचा मृत्यू झाला. या प्रकरणात प्रेयसीच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण ६ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

दोघांचा मृत्यू
दोघांचा मृत्यू

By

Published : Jul 17, 2021, 11:34 AM IST

करंजविहीरे (पुणे ) - एका २१ वर्षीय तरुणीला प्रियकराने पळवून नेले असता, मुलीच्या नातेवाईकांनी हॉटेल माणुसकी येथे बोलावून मुलाला बेदम मारहाण केली. यात प्रियकरासह त्याच्या मित्राचा मृत्यू झाला. या प्रकरणात प्रेयसीच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण ६ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील करंजविहिरे (ता.खेड ) येथील हॉटेल माणुसकीच्या समोर हॉटेल मालक बाळू मरगज यांची वीटभट्टी आहे. वीटभट्टीवर काम करणारे कामगार बाळू सिताराम गावडे (वय 26 वर्ष रा.आसखेड खुर्द,ता. खेड, जि. पुणे) व राहुल दत्तात्रय गावडे (वय 26 वर्ष रा.आसखेड खुर्द,ता. खेड, जि. पुणे)
यांनी हॉटेल मालक यांची २१ वर्षीय मुलीला बाळू सिताराम गावडे यांनी पळून घेऊन गेले होते. मुलगी व पळून नेणारे बाळू ,राहुल यांचा नातेवाईकांनी शोध घेऊन त्यांना हॉटेल माणुसकी या ठिकाणी आणून लाकडी काठी,लोखंडी रॉड यांनी बेदम व अमानुषपणे मारहाण केली. या मारहाणीत बाळू व राहुल या दोघांचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी त्याठिकाणाहून पळ काढला. मात्र, पोलिसांनी अनिल संभाजी कडाळे,राजू साहेबराव गावडे,किरण बाळू मेंगाळ, चंद्र करा उर्फ मुक्ता बाळू गावडे,आनंदा सीताराम जाधव,बाळू मरगज( हॉटेल मालक) यांना अटक केली आहे. पुढील तपास चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details