पुणेपिंपरी-चिंचवडमध्ये एकतर्फी प्रेमातून प्रेयसीच्या भावाचा अपहरण करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असली तरी पिंपरी- चिंचवड पोलिसांचा धाक राहिला नाही का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. Pune Crime अपहरण करून खून करण्यात आलेल्या मुलाचे वय 7 वर्षे आहे. या प्रकरणी मंथन किरण भोसले आणि अनिकेत श्रीकृष्ण समदर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहे. Kidnapping and murder घटनेला वेगळं वळण मिळावं, म्हणून आरोपींनी अपहरण करून खून करण्यात आलेल्या मुलाच्या कुटुंबियांना 20 कोटींची खंडणी मागितली. तसेच, पिंपरी चिंचवड पोलीस Pimpri Chinchwad Police आयुक्तालयाचे अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे ( Commissioner Police Sanjay Shinde ) यांनी कौटुंबिक कारण पुढे करत मूळ कारण सांगण्यास नकार दिला आहे. सर्व बाजूंनी तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
सोसायटीच्या पार्किंगमधून अपहरण गुरुवारी या 7 वर्षीय मुलाच राहत्या सोसायटीच्या पार्किंग मधून अपहरण झालं होतं. याबाबत खून झालेल्या मुलाच्या वडिलांनी पिंपरी पोलिसात अपहरणाची तक्रार दिली. पिंपरी पोलीस आणि गुंडा विरोधी पथकासह शेकडो पोलीस कर्मचारी आरोपींचा शोध घेत होते. तेव्हा, आरोपी मंथनच 7 वर्षीय मुलाच्या बहिणीवर एकतर्फी प्रेम असल्याचे पुढे आलं आहे. तसेच दोन्ही कुटुंबात वाद झाले होते. याच रागातून आरोपी मंथनने मित्र अनिकेतच्या मदतीने 7 वर्षीय मुलगा राहत असलेल्या सोसायटीच्या पार्किंगमधून अपहरण केलं तिथंच त्याच नाक आणि तोंड दाबून खून केला आहे. या अपहरणाचा कट गेल्या 10 दिवसांपासून रचला गेला होता. अपहरण करून खून करण्यात आलेल्या मुलाचा मृतदेह भोसरी MIDC परिसरातील पडक्या इमातीवरील टेरिसवर नेहून ठेवला.