महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

केशवराव जेधेमुळेचे माझ्या राजकारणाला सुरुवात - शरद पवार - केशवराव जेधे पुस्तक प्रकाशन

केशवराव जेधे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त डॉ. य. दि. फडके लिखित 'देशभक्त केशवराव जेधे चरित्र पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी पवार यांनी जेधे यांच्याविषयींच्या आठवणींना उजाळा दिला.

Keshavrao Jedhe Charitra book
Keshavrao Jedhe Charitra book

By

Published : Nov 9, 2021, 9:15 PM IST

Updated : Nov 9, 2021, 9:27 PM IST

पुणे - केशवराव जेधे यांनी माझ्या मातोश्री शारदाबाई पवार यांना लोकल बोर्डाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे तिकिट दिले आणि तेथूनच माझ्या राजकारणाची सुरुवात झाली, असे म्हणावे लागेल. असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. तसेच केशवरावांनी मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत सामान्य माणसाचे हित पाहिले. त्यांनी दिलेल्या प्रेरणेची कृतज्ञता अखेरपर्यंत मनात राहील, अशा शब्दांत देखील यावेळी शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

केशवराव जेधे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त डॉ. य. दि. फडके लिखित 'देशभक्त केशवराव जेधे चरित्र पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव, केशवराव जेधे फाउंडेशनचे अध्यक्ष दिग्विजय जेधे आदी मान्यवर उपस्थित होते.

सभेत बोलताना शरद पवार
राजकीय प्रवासाची सुरुवातही जेधे यांच्यामुळेच -
पवार यांनी आपल्या कुटुंबाच्या राजकीय प्रवासाची सुरवात हे जेधेंमुळे झाल्याचे सांगितले. त्या काळात लोकल बोर्डासाठी संपूर्ण जिल्ह्यातून महिलेसाठी एकच जागा राखीव होती. त्या जागेवर आमच्या मातोश्री शारदाबाई यांनी केशवरावांनी तिकिट दिले आणि त्या लोकल बोर्डावर निवडून आल्या. केशवराव हे काँग्रेसचे खासदार झाल्यानंतर त्या वेळी झालेल्या सत्कार सभेला मी हजर होतो, याची आठवण देखील यावेळी पवार यांनी सांगितली.
पण ते दुर्देवाने नामंजूर झाले -
पुण्यातील पर्वती मंदिर सर्वांसाठी उघडण्यासाठी सत्याग्रह करण्याचा निर्णय त्यांनी केशवराव जेधे यांनी घेतला. त्यावेळी त्यांच्यावर दगळफेक झाली पण ते डगमगले नाहीत. तेव्हाच्या पुणे नगरपालिकेत सत्ता असताना केशवराव यांनी मुलांसह मुलींनाही शिक्षण देणे आणि दलितांसाठी सार्वजनिक ठिकाणी पाणी देणे असे दोन ठराव मांडले. पण ते दुर्देवाने नामंजूर झाले. बार्डोलीच्या सत्याग्रहाला पाठिंब्यासाठी त्यांनी पुणे जिल्ह्यात सभा घेतली. शेतकऱ्यांचे प्रश्न या निमित्ताने मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यासाठी त्यांना ब्रिटिश सरकारने अटक केली आणि त्यांना तुरुंगवासही झाला. अशा आठवणी देखील पवार यांनी यावेळी सांगितल्या.
Last Updated : Nov 9, 2021, 9:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details