पुणे - श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी दर्शन घेतले. यावेळी देशात सुख-समृद्धी व शांतता रहावी, अशी प्रार्थना त्यांनी गणरायाचरणी केली. गेहलोत यांच्या हस्ते गणरायाची आरती झाल्यानंतर ट्रस्टतर्फे त्यांचा महावस्त्र, सन्मानचिन्ह, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी घेतले 'दगडूशेठ' गणपतीचे दर्शन
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी दर्शन घेतले. यावेळी देशात सुख-समृद्धी व शांतता रहावी, अशी प्रार्थना त्यांनी गणरायाचरणी केली.
यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उत्सवप्रमुख, विश्वस्त व पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, राजाभाऊ चव्हाण, राजेश पांडे, सुनील पांडे आदी उपस्थित होते. मंगळवारी सकाळी ९.३० वाजता गेहलोत यांचे गणपती मंदिरामध्ये आगमन झाले. त्यावेळी ट्रस्टच्या विश्वस्तांनी त्यांचे स्वागत केले.
मंदिरात गणरायाचे दर्शन, आरती झाल्यानंतर सुरक्षाभिंतीवर लावण्यात आलेल्या ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांची माहिती देखील त्यांनी जाणून घेतली. ससूनमध्ये रुग्णांना दररोज देण्यात येणाऱ्या सकस भोजन व्यवस्थेची माहिती विश्वस्तांनी यावेळी त्यांना दिली. गहलोत यांनी ट्रस्टच्या अभिप्राय वहीमध्ये सबका मंगल हो... असा अभिप्राय लिहीत गणरायाचरणी पुन्हा एकदा प्रार्थना केली. देशात सुख-समृद्धी व शांतता रहावी, अशी प्रार्थना देखील त्यांनी गणरायाचरणी केली.
हेही वाचा -MPSC Result 2022 : महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर