महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कन्हैया कुमार, मेवानी यांनी काँग्रेसचे विचार मान्य केल्याचे दिसते, त्यांचे स्वागत - सुशीलकुमार शिंदे

गेल्या 5 ते 6 वर्षांपासून कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी हे दोन्ही काँग्रेसच्या संपर्कात होते. पण, त्यांनी कधी पक्षात येण्याची भूमिका घेतली नाही, पण आता त्यांनी काँग्रेसचे विचार मान्य केल्याचे दिसते, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.

Jignesh Mewani Congress entry Sushilkumar Shinde reaction
कन्हैया कुमार काँग्रेस विचार

By

Published : Sep 30, 2021, 10:47 PM IST

पुणे - गेल्या 5 ते 6 वर्षांपासून कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी हे दोन्ही काँग्रेसच्या संपर्कात होते. पण, त्यांनी कधी पक्षात येण्याची भूमिका घेतली नाही, पण आता त्यांनी काँग्रेसचे विचार मान्य केल्याचे दिसते. आज काँग्रेस चढत्या क्रमांकावर नसून ती खाली येत आहे. अशावेळी ही मंडळी काँग्रेसमध्ये येत असतील तर त्यांचे स्वागतच आहे, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.

प्रतिक्रिया देताना माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे

हेही वाचा -पर्यावरण बदलाच्या कार्यात शहरांनी पुढाकार घ्यावा; पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे आवाहन

लोकशाहीसाठी समंजस संवाद आणि डेमोक्रॅटिक डायलॉग पब्लिक नेटवर्क यांच्यावतीने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे डॉ. डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती पी.डी पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ संपादक विजय नाईक आणि ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. येथे शिंदे यांनी हे मत व्यक्त केले.

राज्यात काँग्रेस कॉमन मिनिमम प्रोग्रामवर एकत्र येत आहे

राज्यात शिवसेनेबरोबर जात असताना काँग्रेसने कॉमन मिनिमम प्रोग्राम स्वीकारला. त्यामुळे, हिंदुत्ववादी अशी काही भूमिका नाही, असे देखील शिंदे यांनी स्पष्ट केले. ज्यांच्या हातात सत्ता होती त्यांना योग्यरित्या चालवता आली नाही. म्हणून तिन्ही पक्षांना कॉमन मिनिमम प्रोग्रामवर एकत्र यावे लागले. केवळ सत्ता मिळवण्यासाठी नव्हे तर, जनतेची सेवा करण्यासाठी हे तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत, असे देखील शिंदे यांनी सांगितले.

संधी घ्यावी लागते

संधी ही घ्यावी लागते. सुशील कुमार शिंदे हे कोणालाच माहीत नव्हते. संधी घेतल्यानंतर सगळ्यांना माहीत झाले की सुशीलकुमार शिंदे कोण आहेत. म्हणून राजकारणात तरुणांना संधी द्यावी लागत नाही, ती त्यांनी घ्यायची असते, असे सल्ला देखील शिंदे यांनी दिला.

हेही वाचा -एकरकमी एफआरपीसाठी भाजपा किसान मोर्चा आक्रमक, पुण्यात साखर संकुलाबाहेर धरणे आंदोलन

ABOUT THE AUTHOR

...view details