महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Kanhaiya Kumar Criticism of PM : नरेंद्र मोदी हे या देशाची समस्या; काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांची टीका - पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाची समस्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे या देशाची समस्या आहे. देशात लोकतंत्राच्या माध्यमातून सत्तेवर आलेला एक व्यक्ती हा तानाशाहाच्या गादीवर बसला आहे, अशी टीका काँग्रेस नेते कन्हैया कुमार (Congress Leader Kanhaiya Kumar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.

Kanhaiya Kumar
कन्हैया कुमार

By

Published : Dec 9, 2021, 5:36 PM IST

Updated : Dec 9, 2021, 8:06 PM IST

पुणे -पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे या देशाची समस्या आहे. देशात लोकतंत्राच्या माध्यमातून सत्तेवर आलेला एक व्यक्ती हा तानाशाहाच्या गादीवर बसला आहे, अशी टीका काँग्रेस नेते कन्हैया कुमार (Congress Leader Kanhaiya Kumar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय काय असा प्रश्न कन्हैया कुमार यांना विचारला असता ते म्हणाले की, कोरोनाला पर्याय शोधला की त्यावर उपाय मिळतो. तसे कोणत्याही समस्येवर उपाय शोधला जातो पर्याय दिला जात नाही. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांच्याशी वार्तालाभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

काँग्रेस नेते कन्हैया कुमार
  • भीक म्हणून पुरस्कार मिळू शकतो, स्वातंत्र्य नाही -

अभिनेत्री कंगना रणौतच्या स्वातंत्र्याबद्दलच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावर देखील कन्हैया कुमार यांनी भाष्य केले आहे. स्वातंत्र्य भीक म्हणून कधीच मिळत नाही. स्वातंत्र्य बलिदानानंतर मिळते, त्यागानंतर मिळते, संघर्ष केल्यानंतर मिळते. लोकांनी आपल्या संपूर्ण आयुष्याचा त्याग करुन स्वातंत्र्य मिळवले आहे. भीक म्हणून पुरस्कार मिळू शकतो, स्वातंत्र्य नाही मिळत. म्हणून मी अशा प्रकारच्या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. माझे माध्यमांना सांगणे आहे की तुम्हीही दुर्लक्ष करा, असे यावेळी कन्हैया कुमार म्हणाले.

  • मोदी सरकार म्हणणे हे देखील चुकीचे -

आज देशात जे चालले आहे ते चुकीचे चालले आहे. मोदी सरकार म्हणणे हे देखील चुकीचे आहे. मोदी सरकार, ममता सरकार हे ट्रेंड भाजपने तयार केलेले ट्रेंड आहेत. विरोधक अगदी बोटावर मोजण्याइतके असताना संसदेचे कामकाज करु दिले जात नाही, हा भाजपचा आरोप चुकीचा आहे. 300 पेक्षा जास्त खासदार यांचे असताना सभागृहाचे कामकाज चालू दिले जात नाही, हा आरोप चुकीचा आहे. बारा खासदारांचे निलंबन अत्यंत चुकीचे असून, देशात लोकशाही अस्तित्वात राहिलेली नाही. मोदींनी देशात तानाशाही चालवली आहे. केंद्र सरकार देशात जातीपाती आणि धर्मावरून राजकारण करून जनतेची दिशाभूल करीत आहे, असा आरोपही कन्हैया कुमार यांनी केला.

  • सध्या डायव्हर्जन आणि रुल या धोरणांचा वापर -

उद्याची हेडलाईन हे ठरवतात, मूळ प्रश्नाला बगल देतात. ब्रिटीशांनी डिव्हाईड आणि रुल हे धोरण वापरले. हे लोक सध्या डायव्हर्जन आणि रुल या धोरणाचा वापर करत आहेत. लोकशाहीच्या माध्यमातून निवडून आलेला एक तानाशाह सध्या गादीवर बसला आहे. निवडणुकीच्या माध्यमातून या तानाशाहीला हटविण्यासाठीच्या लढाईला कमकुवत करू नये, असे देखील यावेळी कन्हैया कुमार म्हणाले

Last Updated : Dec 9, 2021, 8:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details