पुणे : महात्मा गांधी यांच्याविषयी बोलताना अर्वाच्च तसेच शिवराळ भाषा वापरणाऱ्या कालीचरण महाराजला पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. कालीचरण महाराजला पुणे पोलिसांनी (Kalicharan Maharaj Custody Of Pune Police) रायपूरमधून ताब्यात घेतल आहे. दरम्यान, यापूर्वी त्याच्याविरोधात (Kalicharan Maharaj Custody) पुण्याच्या खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कालीचरण महाराज याला दुपारी पुण्यात आणले जाणार आहे.
कालीचरण महाराज पुणे पोलिसांच्या ताब्यात
काही दिवसांपूर्वा कालीचरण महाराजने राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्याविषयी बोलताना अर्वाच्च भाषा वापरली होती. तसेच गांधीजींविषयी बोलताना शिवराळ भाषा वापरत गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसेचा उदोउदो केला होता. कालीचरण महाराजाच्या या वक्तव्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्याला उत्तराखंड पोलिसांनी अटक केले होते. आता उत्तराखंडमधील रायपूर पोलिसांकडून कालीचरण महाराजला पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मिलिंद एकबोटे यांच्यावरही आहे गुन्हा दाखल