पुणे -जुन्नर तालुक्यातील पिपंळवंडी येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम फोडणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना आळेफाटा पोलिसांनी अटक केली आहे. तर एक जण फरार झाला आहे.
एटीएम फोडणाऱ्या अट्टल चोरांना अटक, एक फरार - पोलीसानी केली अटक
जुन्नरमध्ये तीन दिवसांपूर्वीच पिपंळवंडी येथे बँक ऑफ महाराष्ट्र बॅंकेचे एटीएम फोडण्यात आले होते. त्याच परीसरातील आणखी तीन दुकाने फोडून त्यातील मुदेमाल लंपास करणाऱ्या दोघांना पारनेर तालुक्यातील मौजे गुरेवाडी येथून पोलिसांनी अटक केली आहे.

तीन दिवसांपूर्वीच पिपंळवंडी येथे बँक ऑफ महाराष्ट्र बॅंकेचे एटीएम फोडण्यात आले होते. त्याच परीसरातील आणखी तीन दुकाने फोडून त्यातील मुदेमाल लंपास करणाऱ्या दोघांना पारनेर तालुक्यातील मौजे गुरेवाडी येथून पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यातील आरोपी राजेंद जाधव, कैलास काळे हे दोघे पोलिसांच्या हाती लागले असून यामधील मास्टरमाईड संतोष उर्फ विजय जाधव याचा शोध आळेफाटा पोलीस घेत असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे आळेफाटा पोलिसांकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा -कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या बालकांसाठी जिल्हा स्तरावर टास्क फोर्स