पुणे -राज्यात एमपीएससी, आरोग्य विभाग, म्हाडा ( MPSC, Department of Health, MHADA And TET Exam Scam ) आणि आता टीईटी परिक्षेत झालेल्या घोटाळ्यानंतर पुणे पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात आत्तापर्यंत 25 आरोपींना अटक ( 25 Accused Arrested ) केली आहे. हा संपूर्ण जाळ अधिक मोठ असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सर्व प्रकरणाची सुरुवात कशी झाली? पोलिसांनी कशी कारवाई केली. याबाबत पुण्याचे पोलीस सहआयुक्त डॉ रवींद्र शिसवे ( Joint Commissioner of Police Dr. Ravindra Shiswe ) यांनी ईटीव्ही भारतला माहिती दिली आहे.
- 'असा' सुरू झाला तपास
आरोग्य भरतीची गट क आणि गट ड ची परीक्षा ही सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. सुरुवातीला वेळापत्रक जाहीर झाले मग परीक्षा रद्द आणि त्यानंतर पुन्हा परीक्षा घेण्यात आली. परीक्षा झाल्यानंतर या परीक्षेचा पेपर फुटला तेही ज्या दिवशी पेपर होता. त्या सकाळी तशी माहितीही आमच्यापर्यंत आली. पण यात किती तथ्य आहे, हे आम्हाला तापासायच होत. कोणी राजकीय हेतूने तर असे बोलले नाही ना हे तापसायच होत. मग आम्ही याबाबत तपास सुरू केला. बीड आणि औरंगाबादमध्ये सायबर पोलिसांनी तपास केला असता पाहिला तांत्रिक पुरावा मिळाला. मग निष्पन्न झाले की खरंच पेपरच्या दिवशी सकाळी पेपेरफुटी झाले आहे. ती मिळालेली लिंक ही आरोग्य संचालयानाला कळविले. त्यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्हाला अधिकार प्राप्त झाले. आम्ही आरोपींना अटक केली. लातूर येथील आरोग्य संचालक यातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे यांनी हा पेपर फोडल्याचे पोलीस तपासात समोर आले. प्रशांत बडगिरे यांने त्याच्याच विभागातील डॉक्टर संदीप जोगदंड यांच्याकडून दहा लाख रुपये आणि श्याम म्हस्के यांच्याकडून 50 लाख रुपये घेऊन हा पेपर फोडला होता. त्यांनाही अटक करण्यात आली, अशी माहिती डॉ. शिसवे यांनी दिली आहे.
- आत्तापर्यंत 25 आरोपींना अटक