महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Gym Trainer Become Thief : कोरोनाच्या काळात नोकरी गेल्याने जिम ट्रेनर बनला चोर, पत्नीच्या मदतीने सोने चोरी - जिम ट्रेनर बनला चोर

पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात ( Pune Samarth Police Station ) 30 नोव्हेंबरला एका सराफाच्या दुकानातून मंगळसूत्र चोरी केल्याचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यांना फुटेजमध्ये आरोपी एका दुचाकीवर जाताना दिसला. दुचाकीच्या आधारे पोलिसांनी तपास करत ( Police arrest thief with help of CCTV footage ) आरोपीला अटक केली आहे.

जिम ट्रेनर
जिम ट्रेनर

By

Published : Dec 11, 2021, 5:28 PM IST

Updated : Dec 11, 2021, 7:22 PM IST

पुणे -कोरोनाच्या काळातील लॉकडाऊनचा परिणाम अनेकांच्या ( Lockdown impact on citizens ) आयुष्यावर झाला आहे. काहीजण गुन्हेगारीकडे वाढले आहेत. पुण्यातही असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. लॉकडाऊनच्या काळात नोकरी गेल्यानंतर जिम ट्रेनरने पत्नीच्या मदतीने चोरी ( Gym trainer become thief ) केल्याचे उघडकीस आले आहे. बाळासाहेब प्रदीप कुमार हांडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात 30 नोव्हेंबरला एका सराफाच्या दुकानातून मंगळसूत्र चोरी केल्याचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यांना फुटेजमध्ये आरोपी एका दुचाकीवर जाताना दिसला. दुचाकीच्या आधारे पोलिसांनी तपास करत आरोपीला अटक केली आहे.

जिम ट्रेनर बनला चोर

हेही वाचा-Illegal Stay In Mumbai : मुंबईत अनधिकृतपणे राहणाऱ्या बांगलादेशी महिलेसह अतिरिक्त पोलीस महासंचालकांविरुद्ध गुन्हा दाखल



1 लाख 22 हजारांची चोरी-

आरोपी बाळासाहेब हांडे ( Balasaheb Hande theft video ) हा 30 नोव्हेंबर रोजी पत्नीला घेऊन परमार ज्वेलर्समध्ये आला होता. यावेळी त्यांनी दागिने विकत घेण्याच्या बहाण्याने सुमारे 22 ग्रॅम सोन्याचे 1 लाख 22 हजार रुपयाचे मंगळसूत्र चोरून गेल्याचे निष्पन्न झाले आहे. चोर हा पूर्वी जिम ट्रेनर होता. लॉकडाऊनच्या काळात कमवायचे साधने बंद झाल्याने त्याने हा चोरीचा प्रकार सुरू केला. पण शेवटी त्याला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा-Gold Seized : शमशाबाद विनातळातून तब्बल 3.6 कोटीचे सोने जप्त, चौघांविरोधात गुन्हा दाखल

लॉकडाऊनच्या काळात काहींना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. तर काहींचे उद्योग व्यवसाय बंद पडले आहेत. यातून आलेल्या नैराश्यातून काही जणांनी आत्महत्या केल्या आहेत. तर दुसरीकडे अनेकांनी संकटावर मात करत पुन्हा नवीन जोमाने व्यवसाय व नोकऱ्या सुरू केल्या आहेत.

सप्टेंबरमध्ये 3 किलो सोन्याची चोरी-

रविवार पेठेतील एका ज्वेलर्समध्ये ग्राहक म्हणून आलेल्या दोन महिलांनीमुंबईच्या सराफ व्यवसायिकाचे तब्बल 3 किलो सोने लंपास केल्याची घटना सप्टेंबर 2021 मध्ये घडली होती. पुण्याच्या मध्यवस्तीत घडलेल्या या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. फरासखाना पोलीस ठाण्यात याप्रकरणी सराफा व्यवसायिक जिनेश बोराणा (वय 33) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार लहान मुलगा आणि दोन महिला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Last Updated : Dec 11, 2021, 7:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details