महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Lifeguard Commits Suicide Pune : लॉकडाऊनमध्ये गेली नोकरी.. लोकांचे जीव वाचविणाऱ्या तरुणानेच केली आत्महत्या - महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव

लाईफगार्ड म्हणून नोकरी करणाऱ्या तरुणाची नोकरी लॉकडाऊन काळात ( Jobless Due To Lockdown ) गेली. नोकरी न मिळाल्याने त्रासलेल्या या तरुणाने आत्महत्या करत स्वतःचेच जीवन ( Lifeguard Commits Suicide Pune ) संपवले. पुण्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे.

तरुणानेच केली आत्महत्या
तरुणाने केली आत्महत्या

By

Published : Jan 11, 2022, 6:08 AM IST

पुणे - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ( Covid Spread In Maharashtra ) अनेकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागलं आहे. कुणाची नोकरी गेली ( Jobless Due To Lockdown ) तर, कोणाचा संपूर्ण व्यवसाय उध्वस्त झाल्याचं पाहायला मिळालं. पुण्यात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पुण्यातील मुंढवा परिसरात नोकरी गेल्याने आलेल्या नैराश्यातून एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली ( Lifeguard Commits Suicide Pune ) आहे. दत्ता पुशीलकर असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे.

सततच्या निर्बंधामुळे नोकरी गेली

लाईफगार्ड म्हणून काम करणारा तरुण लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याने त्रस्त होता. यातूनच त्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज आहे. पुण्यात घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पुणे शहरातील केशवनगर मुंढवा येथे राहणाऱ्या तरुणाने आत्महत्या केली. दत्ता पुशीलकर असं टोकाचं पाऊल उचलणाऱ्या तरुणाचं नाव आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेला लॉकडाऊन, सततच्या निर्बंधामुळे दत्ताची नोकरी गेल्याची माहिती आहे. याच कारणामुळे तो त्रस्त होता, असंही बोललं जातं. 2020 पासून काम नसल्याने या तरुणाने हे टोकाचं पाऊल उचलल्याचे सांगितलं जातं आहे. एकेकाळी इतरांच्या जीवाचं रक्षण करणाऱ्या उमद्या तरुणाने स्वतःचंच जीवन संपवल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details