पुणे - राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर (Jitendra Avhad on OBC Reservation) त्यांच्यावर अनेकांनी टीका केली होती. यावर रविवारी झालेल्या वंजारी समाजाच्या मेळाव्यात विचारले असता, आजही माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. जे आधी बोललो तेच कायम आहे. पोटात एक आणि ओठात एक असं बोलणाऱ्यांपैकी मी नाही. मी जे बोलतो हृदयापासून बोलतो, असेही यावेळी मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले. पुण्यात राज्यस्तरीय वंजारी समाजाचा महामेळाव्यात ते बोलत होते.
Jitendra Avhad on OBC Reservation : मी आजही वक्तव्यावर ठाम - मंत्री जितेंद्र आव्हाड - गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ओबीसी आरक्षण
फॅमिली पार्श्वभूमी नसताना गेल्या 12 ते 13 वर्षापासून राजकारणात आलो आहे. सध्याच्या पातळीवर जे काही खालच्यापातळीवर राजकारण सुरू आहे. ते मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिलं नाही. असेही गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad on OBC Reservation) म्हणाले.
मंत्री जितेंद्र आव्हाड
समाज कसं व्यवस्थित राहील यासाठी प्रयत्न करावं
राज्यात नव्याने लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे गोंधळाच वातावरण निर्माण झालं आहे ,अशी टीका विरोधी पक्षाच्या माध्यमातून केली जात आहे. याबाबत आव्हाडांना विचारलं असता ते म्हणाले की, कोरोना हे काही विरोधी पक्ष किंवा सत्ताधारी पक्ष बघत नाही. तर समाज कसे व्यवस्थित राहील यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. तुम्हाला विश्वासात घेतलं नाही म्हणून काय ओमायक्रॉन होणार अथवा वाढणार नाही, असेही यावेळी आव्हाड म्हणाले.