महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या जीम ट्रेनरला अटक - विद्यार्थीनीचा विनयभंग करणाऱ्या जिम ट्रेनरला अटक

विद्यार्थिनीशी ओळख वाढवून तिच्या महाविद्यालयात जाऊन विनयभंग करणाऱ्या जीम ट्रेनरला पुण्यातील बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी 19 वर्षीय विद्यार्थिनीने तक्रार दिली आहे.

abuse-girl-in-pune
जिम ट्रेनरला अटक

By

Published : Mar 6, 2020, 11:54 PM IST

पुणे - जीममध्ये येणाऱ्या विद्यार्थिनीशी ओळख वाढवून तिच्या महाविद्यालयात जाऊन विनयभंग करणाऱ्या जिम ट्रेनरला पुण्यातील बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. कृष्णा प्रकाश कदम (वय 22) असे जीम ट्रेनरचे नाव आहे. याप्रकरणी 19 वर्षीय विद्यार्थिनीने तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी बिबवेवाडी येथील येथील एका जिममध्ये जात होती. त्या ठिकाणी कृष्णा कदम हा जिम ट्रेनर म्हणून काम करत होता. दरम्यानच्या कालावधीत कृष्णा कदम याने या तरुणीशी ओळख वाढविली आणि तो सतत तिच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करू लागला. एकदा तर भर रस्त्यात त्याने मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, असे सांगत तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले होते. परंतु तरुणीने त्याला दाद दिली नाही.

दरम्यान आरोपी ही तरुणी शिकत असलेल्या महाविद्यालयात तिचा पाठलाग करत गेला. तरुणीची परीक्षा सुरू असताना त्याने वर्गात जाऊन तिच्या हाताला धरून बाहेर आणले आणि माझ्याशी का बोलत नाहीस, बोलली नाहीस तर जीवाचे बरेवाईट करून घेईन अशी धमकी दिली. तसेच महाविद्यालय परिसरात तो तिच्या अंगावर ओरडला. यानंतर तरुणीने बिबवेवाडी पोलिसात त्याच्याविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली.

ABOUT THE AUTHOR

...view details