पिंपरी चिंचवड -मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती ( Mp Sambhajiraje Strike ) यांनी मुंबईत आमरण उपोषण सुरु केले आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मराठा आरक्षणाचा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या आंदोलनाचा विचार करावा, असे जयंत पाटील यांनी म्हटलं ( Jayant Patil On Sambhajiraje Strike ) आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिसंवाद यात्रेदरम्यान जयंत पाटील पिंपरी चिंचवड शहरात आले होते. तेव्हा प्रसारमाध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणाचा विषय आता केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. त्यांच्याशी पुन्हा चर्चा करुन, त्यावर मार्ग काढणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांच्या आंदोलनाचा विचार करावा, असे आवाहन पाटील यांनी केलं आहे.
किरीट सोमैयांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर टीका केली होती. त्यावर बोलताना पाटील यांनी सांगितले, प्रसिद्धी आणि लक्ष वेधू घेण्यासाठी मोठ्या व्यक्तींवर आरोप करायची सोमैया यांना सवय लागली आहे. उत्तर प्रदेश आणि अन्य राज्यातील निवडणुकांसाठी लक्ष वेधण्याचा हा प्रकार असल्याचेही पाटील यांनी म्हटलं.
चर्चेतून मार्ग निघेल