महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'...म्हणजेच माजी गृहमंत्री फडणवीसांनी मातोश्री बाहेर कॅमेरे लावले होते' - साहित्य कलावंत संमेलन

माजी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात, मातोश्री बाहेर सीसीटिव्ही कॅमेरे लावले होते. हे चंद्रकांत पाटलांना माहित आहे. म्हणूनच त्यांनी शिवसेनेने राष्ट्रवादीला गृहमंत्रीपद देऊ नये, असे म्हटले असल्याचे जयंत पाटील यांनी म्हणाले.

Jayant Patil and Chandrakant Patil
जयंत पाटील आणि चंद्रकांत पाटील

By

Published : Dec 28, 2019, 3:26 PM IST

पुणे -शिवसेनेने राष्ट्रवादीला गृहमंत्री पद दिल्यास मातोश्रीबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लागतील, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हणाले होते. त्यांच्या त्या विधानाचा समाचार घेताना जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांनाच टोला लगावला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा सरळ अर्थ म्हणजे, माजी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मातोश्री बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. हे चंद्रकांत पाटलांनाही माहित आहे. म्हणूनच त्यांनी राष्ट्रवादीला गृहमंत्रीपद देऊ नये, असे म्हटले आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

अर्थमंत्री जयंत पाटील यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा... ज्येष्ठ व्यंगचित्रकार विकास सबनीस यांच्यांवर अंत्यसंस्कार, मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंनी घेतले अंत्यदर्शन

मंत्री निवडण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना - जयंत पाटील

सोमवारी राज्याच्या मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोण कोणते मंत्री शपथ घेतील, याबाबत पाटील यांना विचारले असता, त्यांनी मंत्र्यांच्या शपथविधीचे सर्व अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आहेत. त्यानुसार ते निर्णय घेतील, असे म्हटले आहे. तसेच राष्ट्रवादीतून उपमुख्यमंत्री कोण, याचा अधिकार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते पुण्यात साहित्य कलावंत संमेलनाचे उद्घाटन

हेही वाचा... काँग्रेसचा १३५ वा स्थापना दिवस दिल्लीत साजरा

पुण्यात साहित्य कलावंत संमेलन

साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे १९ वे साहित्यिक कलावंत संमेलन पुण्यात होत आहे. शनिवार २८ डिसेंबर व २९ डिसेंबर रोजी कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात याचे आयोजन केले आहे. या संमेलनाचे उद्‌घाटन राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. संमेलनाचे अध्यक्षस्थानी संत साहित्य आणि लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे भूषवणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details