पुणे - 'कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक हरलो, तर हिमालयात जाणार', असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil Statement On Kolhapur North By Election ) यांनी केला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ( Jayant Patil Criticized Chandrakant Patil ) विचारलं असता ते म्हणाले की, 'पराभव झाला तर हिमालयात जाईन, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. आता ते हिमालयात जाणार असतील तर मीही त्यांच्यासोबत जाऊन येईन, माझी ही इच्छा आहे हिमालयात जाण्याची. चंद्रकांत पाटील आणि माझे चांगले संबंध आहेत.' असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे.
राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न -कोल्हापूर पोट निवडणुकीचा जसा तुम्हाला आनंद झाला आहे. तसा मला देखील झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकसंघ पद्धतीने काम केल आहे. राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याचे काम काही लोक करतात. त्यांना ही चपराक मिळाली आहे. असं देखील यावेळी पाटील म्हणाले.