महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Bhagwangad dasara melava: यंदा भगवान गडावर दसरा मेळावा होणारच-जय भगवान महासंघाचा निर्धार

जय भगवान महासंघाच्या वतीने भगवान गडावर खंडित झालेला दसरा मेळावा (Bhagwangad dasara melava) यावर्षी पासून पुन्हा सुरू करण्यात येत आहे. हा संकल्प मेळावा कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याशी अथवा पक्षाशी संलग्न असणार नाही, अशी भूमिका जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी घेतली आहे.

dasara melavawill be held at Bhagwangad
dasara melavawill be held at Bhagwangad

By

Published : Oct 4, 2022, 10:11 AM IST

पुणे: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात ठाकरे (thackeray dasara melava) आणि शिंदे (shinde dasara melava) यांच्या दसरा मेळाव्यानंतर आत्ता भगवान गडावरील दसरा मेळावा चर्चेत आला आहे. ( Bhagwangad dasara melava ). जय भगवान महासंघाच्या वतीने भगवान गडावर खंडित झालेला दसरा मेळावा यावर्षी पासून पुन्हा सुरू करण्यात येत आहे. पोलिसांकडून या दसऱ्या मेळाव्याला परवानगी नाकारली असताना देखील यंदापासून भगवान गडावर पारंपरिक पद्धतीने दसरा मेळावा होणार आहे, अशी स्पष्ट भूमिका जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी घेतली आहे.

मेळाव्याचा वापर राजकीय फायद्यासाठी नाही: भगवान गडावर गेल्या अनेक वर्षापासून दसरा मेळावा होत होता. मात्र काही कारणामुळे गेल्या दोन-तीन वर्षापासून ही परंपरा खंडित झाली आहे. गडाचे महंत न्यायाचार्य डॉक्टर नामदेव शास्त्री महाराज यांनी यावर्षी घोषणा केली आहे की, गडाच्या माथ्यावर कोणत्याही प्रकारचे राजकीय भाषण होणार नाही. येत्या पाच ऑक्टोबरला विजयादशमीच्या दिवशी आम्ही भगवानगडाच्या पायथ्याला एकत्रित येण्याचा संकल्प करीत आहोत. हा संकल्प मेळावा कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याशी अथवा पक्षाशी संलग्न असणार नाही, जो कोणी भगवान भक्त असेल त्याला या भगवानगडाच्या पायथ्याला होणाऱ्या मेळाव्याला हजर राहता येईल अशी आमची भूमिका आहे असे सानप यांनी म्हटले आहे.


ABOUT THE AUTHOR

...view details