पुणे - ओमायक्रॉनच्या रूपाने नवे संकट सध्या घोंगावत आहे. (Omicron News Updates Maharashtra) आत्ता कुठे निर्बंधांमध्ये शिथिलता मिळाली होती. त्याचवेळी ओमायक्रॉनने भीती वाढवली आहे. त्यामुळे आता पुन्हा लॉकडाउन लागतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभीमीवर लोकांमध्ये (Omicron patients Maharashtra) काही प्रमाणात धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. या ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रभावाने कर्मचारी वर्गही धास्तावला आहे. बहुतांश कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या जीवाशी न खेळता किमान पुढील सहा महिने ते एक वर्ष वर्क फ्रॉम होम सुरू ठेवले पाहिजे, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे.
नवीन वर्षाच्या मुहूर्तावर ऑफिसमध्ये हजर राहण्यासाठीच्या सूचना
कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत असताना शिथिल झालेल्या निर्बंधांमुळे उद्योग व्यवसायाची चाके हळूहळू पूर्वीप्रमाणे रुळावर येत आहेत. खासगी, सरकारी कार्यालये नियमांच्या अधिन (IT Companies Work from Home ) राहून सुरू झाली आहेत. त्यातच आता बहुतांश आयटी कंपन्यांनीही 'वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाच्या मुहूर्तावर ऑफिसमध्ये हजर राहण्यासाठीच्या सूचना देण्यास सुरुवात केली आहे.
४० टक्के कर्मचाऱ्यांचे ऑफिसमधून काम सुरू
कोरोना महामारीच्या काळात आयटी कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचे धोरण अवलंबले होते. त्यानुसार मागील दीड वर्षांपासून बहुतांश कर्मचारी घरूनच काम करत आहेत. (Work from Home ) मात्र, सध्या कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्याने निर्बंधांमध्ये शिथिलता आली आहे. जनजीवन, उद्योग, व्यवसाय, वाहतूक पूर्वपदावर आले आहेत. काही आयटी कंपन्यांनी कार्यालये सुरू केल्याने जवळपास ४० टक्के कर्मचाऱ्यांचे ऑफिसमधून काम सुरू झाले आहे. तर जे कर्मचारी अद्यापही घरून काम करीत आहेत, त्यांना ऑफिसमध्ये हजर राहण्यासंबंधीच्या सूचना देण्यास कंपन्यांनी सुरुवात केली आहे.
पुण्यामध्ये जवळपास सहा लाख आयटी कर्मचारी
पुण्यामध्ये जवळपास सहा लाख आयटी कर्मचारी आहेत. त्यातील ४० टक्के कर्मचाऱ्यांचे ऑफिसमधून काम सुरू झाले आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांनाही आता ऑफिसमध्ये रुजू होण्याच्या सूचना येत आहेत. परंतु, आता पुन्हा नव्याने आलेल्या ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेऊन कंपन्यांनी आणखी काही महिन्यांसाठी वर्क फ्रॉम होम सुरू ठेवावे. ऑफिस सुरू करून कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ नये. शासनाने कंपन्यांना त्यासंबंधीचे आदेश दिले पाहिजेत. असे नैसेन्ट इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉइज सिनेटचे अध्यक्ष हरप्रीत सलूजा यांनी सांगितले.
हेही वाचा -बाप आजारी असताना चर्चा करता का..? मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर टीका करणाऱ्या विरोधकांवर आव्हाडांचा संताप