पुणे -मुंबईसह पुण्यात आयकर विभागाची कालपासून छापेमारी सुरू आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे, शिवसेनेचे पदाधिकारी, शिर्डी देवस्थानचे विश्वस्त राहुल कनाल तसेच सदानंद कदम यांच्या निवासस्थानी आयकर विभागाने धाड टाकली होती. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशीही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी सुरु ( IT Raid Bajrang Kharmate ) आहे.
पुण्यातील औंध भागातील बजरंग खरमाटे यांच्या घरी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल ( मंगळवार ) सकाळपासून तळ ठोकला आहे. भाजपा नेते किरीट सोमैया यांनी मंत्री अनिल परब यांची बेनामी संपत्ती बजरंग खरमाटे यांच्या नावावर असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी खरमाटेंच्या भुगावमधील फार्म हाऊसवर छापा टाकण्यात आलेला. आता पुन्हा आयकर विभागाने खरमाटे यांच्या औंध येथील घरी छापा टाकला आहे.