महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कुठला बॉम्ब फोडायचा हे फडणवीस यांनी स्वतःच ठरवावे - नीलम गोऱ्हे - कुठला बॉम्ब फोडायचा हे फडणवीसांनी ठरवावे

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कुठला बॉम्ब फोडायचा? चॉकलेटचा की शेवेचा, हे त्यांनी त्यांचे ठरवावे. मात्र त्यांनी स्वतःची दिवाळी चांगली साजरी करावी, चांगले संगीत ऐकावे असे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.

कुठला बॉम्ब फोडायचा हे फडणवीस यांनी स्वतःच ठरवावे - नीलम गोऱ्हे
कुठला बॉम्ब फोडायचा हे फडणवीस यांनी स्वतःच ठरवावे - नीलम गोऱ्हे

By

Published : Nov 3, 2021, 3:15 PM IST

पुणे : दिवाळीनंतर फोडणारा बॉम्ब चॉकलेटचा आहे की शेवेचा हे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं ठरवावं. मात्र येणारी दिवाळी ही स्वतः पण चांगली साजरी करावी, चांगले संगीत ऐकावे अशा शब्दांत शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.

कुठला बॉम्ब फोडायचा हे फडणवीस यांनी स्वतःच ठरवावे - नीलम गोऱ्हे

चांगले संगीत ऐका

देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असे विधान केले होते. या वक्तव्यावर नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, देवेंद्रजी हे विरोधी पक्षनेते म्हणूनच नेहमी कार्यरत असतात आणि त्यांनी तेच करावं. दिवाळीनंतर फोडणारा बॉम्ब चॉकलेटचा आहे की शेवेचा हे त्यांनी त्यांचं ठरवावं. मात्र येणारी दिवाळी ही स्वतः पण चांगली साजरी करावी, चांगले संगीत ऐकावे असे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.

पुणे महापालिकेवर भगवा फडकणार

केंद्र सरकार आणि पुणे महापालिकेवर सध्या भाजपची सत्ता आहे. मात्र त्यांनी चालवलेले हे सरकार सर्वसामान्यांसाठी घातक आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत आहे. त्यामुळे जनता येत्या निवडणुकीत शिवसेनेकडून कौल देईल आणि पोटनिवडणूक जिंकली तसेच येत्या निवडणुकीत पुणे महानगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकेल अशी आशा निलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details