महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुण्यात आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणाची पिस्तूलातून गोळी झाडून आत्महत्या - तरुण

मृत तरुण हा पुण्याच्या विमान नगर येथील आयटी कंपनीत कामाला होता. त्याने तीन दिवसांपूर्वीच नोकरी सोडली होती.

प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : Jul 22, 2019, 1:39 AM IST

पुणे-आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणाने पिस्तूलातून छातीत गोळी झाडून आत्महत्या केल्याची समोर आले आहे. ही घटना रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पिंपळे गुरव येथ घडली आहे. सचिन शिवाजी वांडेकर (वय-२८, मूळ राहणार-आष्टी) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मृत सचिन, लहान भाऊ दीपक शिवाजी वांडेकर आणि विशाल अशोक लहाने हे तिघे जण एकत्र रुम करून पिंपळे गुरव येथे राहात होते. रविवारी सायंकाळी विशाल हा बाथरूममध्ये होता तर लहान भाऊ दीपक हा जिन्याच्या पायऱ्या उतरून खाली जात होता. तेवढ्यात, गोळी झाडल्याचा आवाज आला. जिन्याच्या पायऱ्या उतरत असणारा भाऊ धावत वर आला, तर विशाल हा देखील बाथरूमधून धावत बाहेर आला. समक्ष पाहिल्यानंतर सचिनने पिस्तूलातून गोळी झाडून आत्महत्या केली होती.

रक्ताच्या थारोळ्यात सचिन पडलेला दिसला. काय करावे हे सुचत नव्हते. अखेर कामठे नावाच्या मित्राला बोलवून गंभीर जखमी असलेल्या सचिनला रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. परंतु त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. दरम्यान, मृत सचिन हा पुण्याच्या विमान नगर येथील आयटी कंपनीत कामाला होता. त्याने तीन दिवसांपूर्वीच नोकरी सोडली होती. असे पोलीस तपासात समोर आले आहे. गंभीर बाब म्हणजे उच्चशिक्षित सचिनकडे पिस्तुल आले कोठून हा प्रश्न अनुउत्तरीत असून त्याचा तपास सांगवी पोलीस करत आहेत.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details