महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ISMT Iron Theft Case : कंपनीतील २६ लाखांच्या चोरी प्रकरणात सुरक्षारक्षकानेच साधला डाव

बारामती एमआयडीसीतील आयएसएमटी कंपनीमधून २६ लाख रुपयांच्या लोखंडाची चोरी (ISMT Iron Theft) झाल्याच्या प्रकाराचा तालुका पोलिसांनी छडा लावला (ISMT Iron Theft solved by Baramati police) आहे. चोरीप्रकरणी चौघांविरोधात तर माल विकत घेणारे तिघे अशा सात जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यांना अटक (Baramati Police arrested Iron Thief) केली आहे.

ISMT Iron Theft Case
ISMT Iron Theft Case

By

Published : Oct 19, 2022, 12:52 PM IST

बारामती : बारामती एमआयडीसीतील आयएसएमटी कंपनीमधून २६ लाख रुपयांच्या लोखंडाची चोरी (ISMT Iron Theft Case) झाल्याच्या प्रकाराचा तालुका पोलिसांनी छडा लावला (ISMT Iron Theft solved by Baramati police) आहे. चोरीप्रकरणी चौघांविरोधात तर माल विकत घेणारे तिघे अशा सात जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यांना अटक (Baramati Police arrested Iron Thief) केली आहे. सुरक्षारक्षकानेच (Company security guard iron theft Baramati) हा डाव साधल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. (Pune Crime) (Latest News from Pune)


'हे' आहेत अटकेतील आरोपी -कंपनीत सुरक्षारक्षक असलेल्या कैलास शांताराम लष्कर (रा. राक्षेवाडी, ता.कर्जत, जि. नगर) याच्यासह आकाश लहू ननवरे, आशिष कांतीलाल लष्कर, आकाश सुनील जाधव (सर्व रा. राक्षेवाडी), लोखंड विकत घेणारे सलमान इम्तियाज खान (रा. बारामती), धर्मेंद्र राजकुमार चौधरी (रा. भिगवण, ता. इंदापूर) व सुरेश लोंकलकर उर्फ तेजा शेठ (रा. तुळजाभवानी नगर, जालना) यांचा अटक केलेल्यांमध्ये समावेश आहे.


कंपाऊंडमधून प्रवेश करत लोखंडाची चोरी - याप्रकरणी पोलिस ठाण्यात कंपनीचे व्यवस्थापक संजय श्रीमंत मस्तुद यांनी फिर्याद दिली होती. २० सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत ही घटना घडली होती. अज्ञातांनी तारेच्या कंपाऊंडमधून आत प्रवेश करत लोखंडाची चोरी केली होती. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश लंगुटे, राहूल घुगे, अश्विनी शेंडगे, तपास पथकातील हवालदार राम कानगुडे, अमोल नरुटे, दत्ता मदने, शशिकांत दळवी, दिपक दराडे, रचना काळे यांच्याकडून सुरु होता.

सुरक्षा रक्षकच निघाला चोर-या पथकाने केलेल्या चौकशीत सुरक्षारक्षक असलेल्या लष्कर याने त्याच्या गावातील तिघांना सोबत घेत ही चोरी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानी हे लोखंड बारामतीत खान व चौधरी यांना विकले. त्यांनी पुढे हा माल जालन्यातील तेजा शेठ यांना विकला. पोलिसांनी जालना गाठत चोरीला गेलेला सर्व माल, गुन्ह्यात वापरलेले वाहन असा ३१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.

ABOUT THE AUTHOR

...view details