महाराष्ट्र

maharashtra

व्हॅलेन्टाईन डे साजरा करण्याअगोदरच कॅन्सरने पत्नीचे निधन, पती करतोयं 'हे' कौतुकास्पद काम

By

Published : Feb 14, 2022, 3:39 PM IST

अवघ्या सहा दिवसांनी व्हॅलेन्टाईन डे असताना अमोल देशपांडे यांच्या पत्नी ईशा देशपांडे यांचे ब्रेस्ट कॅन्सरने निधन झाले. जन्मोजन्मी सोबत राहण्याची स्वप्नं भंग पावली. मात्र, आपल्या पत्नीसोबत जे झाले ते दुसऱ्यांना होऊ नये यासाठी अमोल देशपांडे तत्परतेने समाजामध्ये ब्रेस्ट कॅन्सरविषयी जनजागृती करत आहेत. त्यांचे हे कार्य खरंच वाखाण्याजोगे आहे.

Isha Deshpande died of breast cancer
इशा देशपांडे ब्रेस्ट कॅन्सर निधन

पिंपरी-चिंचवड (पुणे) -अवघ्या सहा दिवसांनी व्हॅलेन्टाईन डे असताना अमोल देशपांडे यांच्या पत्नी ईशा देशपांडे यांचे ब्रेस्ट कॅन्सरने निधन झाले. जन्मोजन्मी सोबत राहण्याची स्वप्नं भंग पावली. मात्र, आपल्या पत्नीसोबत जे झाले ते दुसऱ्यांना होऊ नये यासाठी अमोल देशपांडे तत्परतेने समाजामध्ये ब्रेस्ट कॅन्सरविषयी जनजागृती करत आहेत. त्यांचे हे कार्य खरंच वाखाण्याजोगे आहे.

हेही वाचा -निवडणुका असलेल्या राज्यात महाराष्ट्राच्या खतांचा साठा केंद्राने वळवला- कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांचा आरोप

इशा यांनी गेल्या वर्षी 6 फेब्रुवारी 2021 रोजी ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत जगाचा निरोप घेतला. इशा यांची प्रकृती चांगली होईल, असे अमोल यांना नेहमी वाटायचे. अमोल म्हणाले की, इशासोबत 2011 ला विवाह बंधनात अडकलो. हे अरेंज मॅरेज होते. पण, आम्हाला नेहमी तो प्रेमविवाह वाटला. कारण, कमी वेळेत आम्ही एकमेकांमध्ये गुंतत गेलो. सुखाने संसार सुरू होता. तीन वर्षांनी मुलगा झाला. हे सर्व सुरळीत असताना अचानक इशाला ब्रेस्ट कॅन्सरची लागण झाली. हे ऐकून आमच्या पायाखालची जमीन सरकली. तिच्यावर अनेक नामवंत डॉक्टर, रुग्णालयात उपचार घेतले, इशा बरी झाली. सर्व काही पुन्हा सुरळीत होईल, असे वाटत असताना ब्रेस्ट कॅन्सरने पुन्हा डोके वर काढले त्यात इशाची प्रकृती खूपच खालावली. डॉक्टरांनी देखील आमच्या हातात काही नसल्याचे सांगितले. यामुळे आम्ही हताश झालो. मात्र, इशाने हार मानली नव्हती. तिची इच्छा शक्ती आणि सकारात्मक विचार यामुळे ती बरी होईल असेच वाटत होत. दोघांना एकत्र व्हॅलेन्टाईन डे साजरा करायचा होता. परंतु, हे कदाचित काळाला मान्य नव्हते. गेल्या वर्षी व्हॅलनटाईन डे अवघ्या सहा दिवसांवर असताना इशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हे दुःख अमोल देशपांडे हे आजही विसरू शकले नाहीत. ब्रेस्ट कॅन्सर वेळीच समजला, उपचारही केले. मात्र, तो पुन्हा झाला आणि इशा यांना हिरावून नेले. या घटनेनंतर ब्रेस्ट कॅन्सरविषयी अमोल देशपांडे यांनी अनेकदा जनजागृती केली आहे. महिलांनी अशा काही संशयास्पद गोष्टी जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही ते म्हणाले.

हेही वाचा -VIDEO : 36 व्या वर्षी दहावी पास झालेली महिला झाली शिक्षिका; पुण्याच्या महिलेचा जिद्दीचा प्रत्यय

ABOUT THE AUTHOR

...view details