पुणे - राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्याने प्रशासनाने विविध उपाययोजना करण्यास सुरवात केली आहे. सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी नाकारून नागरिकांना गर्दीत न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील कॅम्प भागातील इराणी इमाम वाडा ही मशीद आजपासून (बुधवार) बंद करण्यात आली आहे.
धर्मगुरू मौलाना कुमैल असगर रिझवी यांची प्रतिक्रिया... हेही वाचा...CORONA : सुप्रसिद्ध गायक अनुप जलोटा हॉटेल मिराजमध्ये 'होम क्वॉरंटाईन'
दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. प्रामुख्याने राज्यात पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. यामुळे पुण्यातील विविध मंदिरे, मॉल्स, तसेच हॉटेलही बंद करण्यात आली आहेत. कोरोना विषाणूच्या प्रसाराचे माध्यम लक्षात घेता सदर विषाणूची लागण एका व्यक्तीस झाल्यास संबंधीत रुग्णांकडून दुसऱ्या व्यक्तीस किंवा त्याच्या संपर्कात आल्याने इतर व्यक्तीस देखील कोरोना संसंर्ग होण्याची शक्यता असते. यामुळेच मशीद बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती धर्मगुरू मौलाना कुमैल असगर रिझवी यांनी दिली.
कोरोनाची भीती लक्षात घेता, सर्वसामान्य नागरिकांनी घरातच नमाज पठण करावे. मशिदीत एकत्र येऊ नये, असे आवाहनही धर्मगुरू मौलाना कुमैल असगर रिझवी यांनी केले आहे.