महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी तपासपथके यवतमाळ, बीडमध्ये - Beed police news

पुणे पोलिसांकडून अद्याप याप्रकरणी कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. याप्रकरणी शक्यता गृहीत धरून पोलीस तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Pooja
Pooja

By

Published : Feb 18, 2021, 2:59 PM IST

पुणे - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला दहा दिवस उलटल्यानंतरही याप्रकरणात अद्याप गती दिसत नाही. याप्रकरणात शिवसेनेची मंत्री संजय राठोड यांचे नाव आल्याने विरोधकांनी हे प्रकरण उचलून धरले असून राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. परंतू पुणे पोलिसांकडून अद्याप याप्रकरणी कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. याप्रकरणी शक्यता गृहीत धरून पोलीस तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सखोल चौकशी

पुणे पोलिसांनी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेले नाही. या प्रकरणाच्या तपासासाठी पुणे पोलिसांची पथके यवतमाळ आणि बीडमध्ये गेली आहेत. या प्रकरणात ज्यांची सखोल चौकशी करण्याची गरज आहे त्यांना पुण्यात बोलावण्यात आल्याची माहिती असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रकरणावरून राजकारण

सात फेब्रुवारी रोजी पूजा चव्हाण हिचा इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून पडल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड या संपूर्ण प्रकरणाचा तपास करीत आहेत. या प्रकरणावरून राजकारण सुरू झाल्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगानेही या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत याचा अहवाल पाठवण्याचे आदेश पुणे पोलिसांना पत्राद्वारे दिले होते. तर पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनीही याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पुणे पोलिसांनी याप्रकरणाचा चौकशी अहवाल राष्ट्रीय महिला आयोग आणि पोलीस महासंचालकांना पाठवला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details