महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पूजा चव्हाण आत्महत्येची सखोल चौकशी करा.. भाजप महिला आघाडीतर्फे पुणे पोलीस आयुक्तांना निवेदन

पुण्यातील मंमदवाडी हडपसर येथे रविवारी एका सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून पूजा चव्हाण या 22 वर्षीय युवतीने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबतची तक्रार वानवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे.

Investigate Pooja Chavan's suicide case
Investigate Pooja Chavan's suicide case

By

Published : Feb 10, 2021, 4:15 PM IST

Updated : Feb 10, 2021, 4:25 PM IST

पुणे - पुण्यातील मंमदवाडी हडपसर येथे रविवारी एका सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून पूजा चव्हाण या 22 वर्षीय युवतीने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबतची तक्रार वानवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील एका मंत्र्यासोबत असलेल्या प्रेम संबंधातून या युवतीने आत्महत्या केल्याची चर्चा समाज माध्यमांवर सुरु आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी या युवतीच्या आत्महत्येबाबत सखोल चौकशी करावी, अशी मागणी करत भाजप महिला आघाडीच्यावतीने पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना याबाबत निवेदन देण्यात आलं आहे.

भाजप महिला आघाडीतर्फे पुणे पोलीस आयुक्तांना निवेदन
पुणे पोलिसांनी सखोल चौकशी करावी -
पूजा चव्हाण या युवतीचे महाराष्ट्रातील एका मंत्र्यांसोबत असलेल्या प्रेमसंबंधातून पूजा चव्हाण यांनी आत्महत्या केल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे हा मंत्री कोण त्याची सखोल चौकशी पुणे पोलिसांनी करावी कारण हा अतिशय गंभीर प्रकार आहे आणि पुणे पोलिसांनी गुन्हेगारांना तात्काळ अटक करावी अशी मागणी आम्ही करत आहोत अशी माहिती भाजप महिला आघाडी अध्यक्ष अर्चना पाटील यांनी यावेळी दिली.
अन्यथा आंदोलन करू -
स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणातील संबंधित मंत्र्यांकडून दबाव आणलं जात आहे. म्हणून आज आम्ही पुणे पोलीस आयुक्तांना भेटून या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. भविष्यात जर या प्रकरणी तपास योग्य दिशेने नाही गेला तर भाजप युवा मोर्चा आणि महिला आघाडीच्यावतीने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
Last Updated : Feb 10, 2021, 4:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details