महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

इंटरनॅशनल पेन फेस्टीवल : 5 तोळे सोने ते जॅपनीज झाडांपासून बनविलेले उरुशी पेन.. जगविख्यात पेन पाहण्याची संधी - पुण्यात इंटरनॅशनल पेन फेस्टीवलचे आयोजन

पुण्यामध्ये इंटरनॅशनल पेन फेस्टीवलचे आयोजन आपटे रस्त्यावरील हॉटेल रामी ग्रँड येथे व्हिनस ट्रेडर्सतर्फे करण्यात आले आहे. सोने तसेच प्लॅटीनम पावडरमध्ये नक्षीकाम केलेला उरुशी पेन.. सोन्याची निब असलेला दीड लाखांचा डिप्लोमॅट पेन त्यासोबतच सुंगधी शाई, सोन्याची पावडर असलेली शाई असे पेन आणि शाईचे विविध प्रकार पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली.

International Pen Festival
International Pen Festival

By

Published : Dec 11, 2021, 6:39 PM IST

Updated : Dec 11, 2021, 6:54 PM IST

पुणे -तब्बल 6 लाखांचा 18 कॅरट गोल्डपासून बनविलेला 5 तोळ्यांचा चमचमचा बाॅलपेन.. दुबई शहर साकारलेला संपूर्ण चांदीचा पेन.. जगभरात मोजके म्हणजे केवळ 516 पेन असलेला शुद्ध चांदीपासून बनविलेला अडीच लाखांचा पेन.. जॅपनिज झाडांपासून बनविलेला आणि सोने तसेच प्लॅटीनम पावडरमध्ये नक्षीकाम केलेला उरुशी पेन.. सोन्याची निब असलेला दीड लाखांचा डिप्लोमॅट पेन त्यासोबतच सुंगधी शाई, सोन्याची पावडर असलेली शाई असे पेन आणि शाईचे विविध प्रकार पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली.

इंटरनॅशनल पेन फेस्टीवलमध्ये जगविख्यात पेन पाहण्याची संधी
पुण्यात इंटरनॅशनल पेन फेस्टीवलचे आयोजन आपटे रस्त्यावरील हॉटेल रामी ग्रँड येथे व्हिनस ट्रेडर्सतर्फे करण्यात आले. फेस्टीवलचे उद्घाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, फ्लेअर पेनचे चेअरमन खुबीलाल राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.
इंटरनॅशनल पेन फेस्टीवलमध्ये जगविख्यात पेन पाहण्याची संधी
जगविख्यात तब्बल 2 हजारापेक्षा अधिक पेन प्रदर्शनात मांडण्यात आले -
पार्कर, वॉटरमन, मॉन्टब्लँक जर्मनी, वॉल्डमन, शेफस, मॉन्टव्हर्दे, स्क्रिक्स टर्की, लॅमी जर्मनी, पायलट, प्लॅटिनम, फ्लेक्सबुक ग्रीस, लिओनार्डो, मॅग्ना कार्टा या आणि अशा जगविख्यात तब्बल 2 हजारापेक्षा अधिक पेन प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत.
इंटरनॅशनल पेन फेस्टीवलमध्ये जगविख्यात पेन पाहण्याची संधी

फेस्टीवलमध्ये २०० रुपयापासून ते 6 लाख रुपये किमतीचे पेन असून फाउंटन पेन, बॉल पेन, रोलर पेन, मल्टीफंक्शनल पेन, कॅलिग्राफी पेन, यांत्रिक पेन्सिल, शाईची विविध ५०० श्रेणी पेन फेस्टीवलमध्ये आहेत.

इंटरनॅशनल पेन फेस्टीवलमध्ये जगविख्यात पेन पाहण्याची संधी
12 डिसेंबरपर्यंत प्रदर्शन राहणार खुले -
आजच्या डिजीटल युगात फाऊंटन पेनच्या वापराला प्रोत्साहन मिळावे आणि फाऊंटन पेनाने लेखनाचा आनंद घेता यावा, यासाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जगभरातील विविध प्रकारचे पेन पुणेकरांना पाहता व खरेदी देखील करता येणार आहेत. दिनांक १२ डिसेंबरपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत आपटे रस्त्यावरील हॉटेल रामी ग्रँड येथे पेन फेस्टीवल सुरु असून सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश आहे, अशी माहिती यावेळी सुरेंद्र करमचंदाणी यांनी दिली.
इंटरनॅशनल पेन फेस्टीवलमध्ये जगविख्यात पेन पाहण्याची संधी
Last Updated : Dec 11, 2021, 6:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details