महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

PUNE BJP नांदेड, मालेगाव अमरावती येथे झालेल्या हिंसक घटनेच्या निषेधार्थ भाजपचे तीव्र आंदोलन - PUNE BJP

भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले, की त्रिपूररमध्ये घटना घडली नसताना तसे भासविण्यात आले होते. राज्यातील नांदेड, अमरावती, मालेगाव येथे नियोजनबद्ध पद्धतीने दंगली घडवण्यात आल्या. त्याच दंगलेखोरांना पाठीशी घालण्याचे काम महाविकास आघाडी सरकारच्यावतीने करण्यात येत आहे.

भाजपचे आंदोलन
भाजपचे आंदोलन

By

Published : Nov 22, 2021, 10:29 PM IST

Updated : Nov 22, 2021, 10:59 PM IST

पुणे - नांदेड, मालेगाव, अमरावती येथे झालेल्या हिंसक घटनांच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. रझा अकादमीने दंगली घडवले, असा भाजपने यावेळी आरोप केला. रझा अकादमीची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणीदेखील यावेळी करण्यात आली.

भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) म्हणाले, की त्रिपूररमध्ये घटना घडली नसताना तसे भासविण्यात आले होते. राज्यातील नांदेड, अमरावती, मालेगाव येथे नियोजनबद्ध पद्धतीने दंगली ( Pune BJP Agitation against violence) घडविण्यात आल्या. त्याच दंगलेखोरांना पाठीशी घालण्याचे काम महाविकास आघाडी सरकारच्यावतीने करण्यात येत आहे. शांततेच्या मार्गासाठी रस्त्यावर लोक उतरले होते. अशा लोकांवरच या सरकारच्यावतीने कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई थांबवब्यात यावी, अशी मागणी आज आम्ही करत आहोत.

हिंसक घटनेच्या निषेधार्थ भाजपचे तीव्र आंदोलन

हेही वाचा-रिक्षा भाडे वाढ : पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्या दीड किलोमीटरसाठी मोजावे लागणार २१ रुपये

म्हणून करण्यात आले आंदोलन

राज्यात याआधी असे कधी घडले नव्हते. तसे हे सरकार करत आहे. दंगलीखोरांना पाठीशी घालण्याचे काम हे सरकार करत आहे. या सरकारचा निषेध म्हणून आम्ही आज आंदोलन करत आहोत, असेदेखील यावेळी मुळीक म्हणाले.

हेही वाचा-Aryanman competition : बारामतीच्या सुपुत्राने आयर्नमॅन स्पर्धा केली 13 तासात पूर्ण

13 नोव्हेंबरच्या हिंसाचारात होते सहभागी?

12 नोव्हेंबर रोजी रजा अकादमीच्यावतीने अमरावती शहरात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या जमावाने अनेक दुकानांची तोडफोड केली. या घटनेच्या निषेधार्थ 13 नोव्हेंबर रोजी भाजपच्यावतीने अमरावती बंदचे आवाहन केले होते. त्यावेळीही हिंसाचार झाला होता. या हिंसाचारात शिवसेना शहरप्रमुख पराग मुद्दे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र घेऊन बंदमध्ये सहभागी झाले होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश वानखडे, पराग गुडदे, सुनील राऊत आणि प्रतीक डुकरे यांच्या नेतृत्वात नमुना परिसरात शिवसैनिकांनी गोंधळ घातला होता. यामुळे पोलिसांनी या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. आज या चारही जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

  • रजा अकादमीच्या तिघांना अटक

12 नोव्हेंबर रोजी रजा अकादमीच्यावतीने अमरावती शहरात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी हिंसाचार घडवणार्‍या प्रकरणात शहर कोतवाली पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. सलाउद्दीन उद्दीन, मोहम्मद आरीफ आणि हाजी मोहम्‍मद वजीर या तिघांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कर्मचाऱ्यांचे सोमवारी काम बंद आंदोलन

Last Updated : Nov 22, 2021, 10:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details