पुणे - राज्यात तत्कालीन भजपा सरकार असताना राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी पुण्याचे तत्कालीन पोलीस उपायुक्त पंकज डहाणे सध्या नागपूर येथे एस. आर. पी. एफ'चे कमांडर आहेत. (Police Pankaj Dahane in phone tapping case) त्यांची यांची पुणे पोलिसांकडून दोन दिवस चौकशी करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण ? -पुणे, शहरातील अमली पदार्थांचे तस्कर व कुविख्यात गुन्हेगारांच्या नावावर राजकीय नेत्यांचे फोन टॅप केल्यावरून माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. शुक्ला यांनी राज्यातील काँग्रेसचे नेते नाना पटोले, मंत्री बच्चू कडू, आशिष देशमुख यांच्यासह पुण्यातील माजी खासदार संजय काकडे यांच्या फोन टॅपिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
पोलीस दलात अनेक ठिकाणी त्यांनी महत्वाच्या पदावर काम - रश्मी शुक्ला या पुणे पोलीस आयुक्तालय मध्ये पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असताना पंकज डहाणे हे पुणे पोलिसात गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत होते. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नाही तर पुणे पोलिसांनी दोन दिवस पंकज डहाणे यांची कसून चौकशी केली आहे. पंकज डहाणे हे मूळचे अमरावतीचे आहेत. पोलीस दलात अनेक ठिकाणी त्यांनी महत्वाच्या पदावर काम केले आहे.