महाराष्ट्र

maharashtra

पुण्यात महागाईविरोधात काँग्रेसचे अभिनव आंदोलन

By

Published : Jul 22, 2021, 5:36 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या घोषणांची ऑडिओ क्लिप लावून त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने "महागाईचा" निषेध करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या काळात दिलेल्या घोषणाच ऑडियो लावून त्यावर नाही म्हणत अभिनव आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव संजय बालगुडे यांच्या कल्पनेतून पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

काँग्रेसचे अभिनव आंदोलन
काँग्रेसचे अभिनव आंदोलन

पुणे- महागाई कम हुई कि नही... पेट्रोल सस्ता हुआ कि नही.. नही.. नही... म्हणत पुणे शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने "महागाईच्या विरोधात अभिनव आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या घोषणांची ऑडिओ क्लिप लावून त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने "महागाईचा" निषेध करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या काळात दिलेल्या घोषणाच ऑडियो लावून त्यावर नाही म्हणत अभिनव आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव संजय बालगुडे यांच्या कल्पनेतून पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी या आंदोलनात माजी आमदार मोहन जोशी, माजी महापौर कमल व्यवहारे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

पुण्यात महागाईविरोधात काँग्रेसचे अभिनव आंदोलन

नरेंद्र मोदी यांच्या ऑडिओ क्लिप शहरभर लावणार

पेट्रोल, डिझेल, गॅस तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत दरोरोज वाढत आहे. मोदी सरकारने या देशाला दिलेला हा सर्वात मोठा फटका आहे. त्याविरोधात आज काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. शंभर दिवसात जे अच्छे दिन येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्याचबरोबर त्यांनी केलेल्या अनेक घोषणांची ऑडिओ क्लिप पुणे शहर काँग्रेसच्यावतीने शहरभर लावून सर्वसामान्य नागरिकांना दाखवण्यात येणार आहे. आज सर्वसामान्य नागरिकांना नरेंद्र मोदी यांचे अच्छे दिन नको तर मनमोहन सिंग असतानाचे दिन हवे आहेत. कोरोनाच्या अशा महामारीच्या काळात सवलत देण्याऐवजी अशा पद्धतीने जीवनावश्यक वस्तूंमध्ये वाढ केल्याने आम्ही त्याचा निषेध करत आहो, असे मत यावेळी माजी आमदार मोहन जोशी यांनी व्यक्त केले.

वाढती महागाई तात्काळ कमी करण्यात यावी -

स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल, डिझेलची इंधन दरवाढ आणि दाळ, खाद्यतेल व इतर जीवनावश्यक वस्तुंची कृत्रिम महागाई केंद्र सरकारच्या चुकीच्या धारेणामुळे झाली आहे. ही सर्व प्रकारची महागाई वाढल्याने आणि कोरोनाने हातचे रोजगार गेल्याने सामान्य माणूस पिचून गेला आहे. महिलांना घर चालविणे कठीण झाले आहे. ही वाढती महागाई तात्काळ कमी करण्यात यावी. १९९६ पासून ते आत्तापर्यंत भारतीय जनता पक्षाने जाहीरनाम्यात किसानों को दाम महेंगाई पर लगाम और बेकारो को काम, हि घोषणा केली होती, त्याचा विपर्यास २०१४ ते २०१९ या सात वर्षात केले आहे. आज शेतकरी रस्त्यावर आहे, तरुण बेरोजगार झाले आहे, अशी टीका यावेळी महाराष्ट्र प्रदेश कांग्रेसचे सचिव संजय बालगुडे यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details