महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ganeshotsav 2022 : गणेशोत्सवाला महागाई फटका; मूर्तींच्या किमतीत 10 टक्क्यांनी वाढ - गणेशोत्सवाची पुण्यात जोरदार तयारी

दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंधात गणेशोत्सव ( Ganeshotsav Pune ) साजरा करण्यात आले होते. त्यामुळे दोन महिन्याआधीच शहरात वातावरण तयार झाले आहे. गणेशत्सवासाठी लागणाऱ्या मूर्तीचे काम हे अंतिम टप्प्यात आले आहे. पण यंदा महागाईचा फटका हा मूर्तींना बसला असून मूर्तींच्या किंमतीत 10 टक्के वाढ झाली आहे.

Ganeshotsav 2022
Ganeshotsav 2022

By

Published : Jul 17, 2022, 3:04 PM IST

Updated : Jul 17, 2022, 3:23 PM IST

पुणे - गेली 2 वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सण उत्सव निर्बंधात साजरे करावे लागले. पण यंदा निर्बंध मुक्त झाल्याने सर्वच धर्मीय सण उत्सव हे मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. पुढच्या महिन्यात सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केल जाणार आहे. कारण दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंधात गणेशोत्सव ( Ganeshotsav Pune ) साजरा करण्यात आले होते. त्यामुळे दोन महिन्याआधीच शहरात वातावरण तयार झाले आहे. गणेशत्सवासाठी लागणाऱ्या मूर्तीचे काम हे अंतिम टप्प्यात आले आहे. पण यंदा महागाईचा फटका हा मूर्तींना बसला असून मूर्तींच्या किंमतीत 10 टक्के वाढ झाली आहे.

आढावा घेताना प्रतिनिधी


यंदा गणेशोत्सवासाठी उत्साह :गणेशोत्सवासाठी बाप्पाच्या मूर्तीचे काम देखील अंतिम टप्प्यात आले आहे. त्याचबरोबर शासनाच्या वतीने यंदा पीओपीच्या मूर्तीला परवानगी मिळाल्याने यंदा एक ते दोन महिन्यांआधीच मूर्ती बुकिंगला सुरवात झाली आहे. दोन वर्ष 50 टक्क्यांपेक्षा कमी मूर्ती विकले गेल्याने आर्थिक संकटात असलेल्या मुर्तीकारांना यंदा मात्र अच्छे दिन येणार असल्याचे चित्र दिसत आहे.



महागाईचा मूर्ती विक्रीवर फटका :गेल्या काही महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तू तसेच पेट्रोल डिझेल आणि घरगुती गॅसमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. वाढती महागाईमुळे मूर्तीसाठी लागणारे साहित्य देखील महाग झाल्याने यंदा मूर्तींच्या किमतीमध्ये दहा टक्के एवढी वाढ झाली आहे. तसेच यंदाच्या गणेशोत्सवामध्ये पीओपीच्या मूर्तींचे प्रमाण हे अधिक असल्याचे यावेळी मूर्ती विक्रेते श्रीकांत शिंदे यांनी सांगितले आहे.



यंदा देखील मानाच्या तसेच विठ्ठलाच्या मूर्तीचे क्रेझ :डिसेंबर महिन्यापासूनच मूर्तिकार बाप्पाची मूर्ती बनवण्यासाठी तयारीला लागतात. पण मागील दोन वर्ष कोरोनामुळे बाप्पाच्या मूर्ती हे कमी प्रमाणात विक्रीला गेल्याने 50 टक्के मूर्ती शिल्लक होते. तर काही नवीन मूर्ती हे देखील यंदाच्या वर्षी बनविण्यात आले आहेत. यंदा देखील पुणे शहरात मानाच्या बाप्पाच्या मूर्ती तसेच दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती आणि विशेष करून विठ्ठलाच्या मूर्तीचा क्रेझ असून नागरिक आत्तापासूनच बाप्पाची मूर्ती बुकिंग करत आहे.

हेही वाचा -Maharashtra Politics : 'ये फेविकॉल जोड है, तुटेगा नहीं', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विश्वास !

Last Updated : Jul 17, 2022, 3:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details