पुणे -शिक्षक पात्रता परीक्षेत (TET) 2019-20 मध्ये सात हजार 880 जण अपात्र उमेदवार पात्र ठरविण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता 2018 मध्ये "टीईटी' परीक्षेला बसलेले उमेदवारही पुणे सायबर पोलिसांच्या रडारवर आले आहेत. सायबर पोलिसांकडून आता 2018 च्या परीक्षेत किती उमेदवारांना पैसे घेऊन पात्र करण्यात आले होते. (Ineligible candidates eligible In TET) याची माहिती काढण्याचे काम सुरु केले आहे. त्यामुळे आता 2018 मध्ये अपात्र असूनही पात्र ठरलेले किती उमेदवार असणार आहेत.
परिक्षार्थींचे मार्क्स वाढविण्यात आले
जे 1800 अपात्र परीक्षार्थींना पात्र करण्यात आलं आहे. त्यात 213 अपात्र परीक्षार्थींना पात्र करण्यात आले आहे. तर, बाकीच्या परिक्षार्थींचे मार्क्स वाढविण्यात आले आहे. (TET Exam Fraud) हे सर्व तीन टप्प्यातील छाननीत आढळून आले आहे. तर अजूनही याची छाननी सुरू असून हा आकडा वाढण्याची देखील शक्यता असल्याचे यावेळी गुप्ता यांनी सांगितले.
अश्या पद्धतीने अपात्र परीक्षार्थींना करण्यात आले पात्र
या गुन्ह्याच्या अध्यापपर्यंतच्या तपासामध्ये एकुण ९ आरोपींना अटक करण्यात आली असून आणखीन १२ आरोपी निष्पन्न झाले असून त्यांचा शोध सुरु आहे. अद्यापपर्यंतचे तपासामध्ये शिक्षक पात्रता परिक्षा (TET) २०१८ परिक्षेमधीत एकूण १३१ परिक्षार्थीींची बनावट प्रमाणपत्रे व वरिष्ठांकडील प्राप्त तक्रारी अर्ज / आरोपीचे व्हॉट्सअॅप चॅट मधील प्राप्त सीट नंबर प्रमाणे तपासात उघड ८२ परीक्षार्थी यांची निकालात पडताळणी केली असता २१३ अपात्र परीक्षार्थींना पात्र केल्याचे निष्पन्न झाले आहे.
वेळा वेबसाईटवर प्रदर्शित करण्यात आली
त्याशिवाय शिक्षक पात्रता परिक्षा (TET) (२०१८)चे मुळ निकालामध्ये एकूण ८१७ परिक्षार्थीचे मार्क्स वाढविण्यात आले असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्या सर्व ८१७ परिक्षार्थीींच्या उत्तरपत्रिका (ओ. एम. आर. शीटस) उत्तरसूची प्रमाणे पडताळणी करण्यात आल्या आहेत. तसेच, या परिक्षेचा मुळ निकाल दिनांक १२ ऑक्टोबर २०१८ रोजी ऑनलाईन प्रदर्शित केल्यानंतर या निकालामध्ये अपात्र असलेले आणखीन ७१० व ३८ परिक्षार्थीचे मार्क्स वाढवून त्यांची माहीती नंतर दोन वेळा वेबसाईटवर प्रदर्शित करण्यात आली आहे.
हेही वाचा -Maratha Reservation : संभाजीराजेंच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातून कार्यकर्ते रवाना; उद्या उपोषण