महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

महाराष्ट्राची मदर तेरेसा; अनाथांची माय सिंधुताई सपकाळ काळाच्या पडद्याआड, वयाच्या 73 वर्षी घेतला अखेरचा श्वास - अनाथांची माय सिंधुताई सपकाळ

अनाथांसाठी आपले जीवन वाहणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांंचे ह्रदयविकाराच्या झटक्याने (Sindhutai sapkal passed away) निधन झाले. मृत्यूसमयी त्या 73 वर्षांच्या होत्या. मंगळवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील गॅलक्झी रुग्णालयात त्यांचे निधन झाले.

sindhutai-sapkal-passed-away
sindhutai-sapkal-passed-away

By

Published : Jan 4, 2022, 10:21 PM IST

Updated : Jan 5, 2022, 12:05 AM IST

पुणे - अनाथांसाठी आपले जीवन वाहणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांंचे ह्रदयविकाराच्या झटक्याने (Sindhutai sapkal passed away) निधन झाले. मृत्यूसमयी त्या 73 वर्षांच्या होत्या. मंगळवारी रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील गॅलक्झी रुग्णालयात त्यांचे निधन झाले. महिनाभरापूर्वी त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया झाली होती. आज अखेर ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांची जीवनज्योत मालवली.

शाहीर सुरेशकुमार वैराळकर

सामाजिक कार्यकर्त्यां आणि ‘अनाथांची माय’ अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ यांना नुकतंच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.सिंधुताई सपकाळ यांनी अनेक खडतर प्रसंगांना तोंड देत हजारो अनाथ मुलांचा सांभाळ केला आहे त्यांना 2012 सली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाला होता तर 2021 आली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं त्या 75 वर्षे वयाच्या होत्या.

माईंना पुरस्कार देण्यासाठी राष्ट्रपती पायऱ्या उतरुन खाली आले -

10 नोव्हेंवर रोजी सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या दोन्ही महिलांच्या पुरस्कारावेळी राष्ट्रपती खुर्चीपासून पायऱ्या उतरुन खाली आले आणि पुरस्कार देऊन दोन्ही महाराष्ट्रीयन महिलांचा सन्मान केला. सिंधुताई आणि जसवंतीबेन यांना पायाने चालता येत नाही, त्यामुळे त्यांना व्हील चेअरवरुन पुरस्कारासाठी राजदरबारात नेण्यात आलं होतं. सिंधुताई सपकाळ गेली चार दशके अनाथांच्या आई म्हणून काम करीत आहेत. म्हणुन त्यांना प्रेमाने त्यांची सारी लेकरे ‘माई’ म्हणतात. सपकाळ यांना डॉक्टरेटची उपाधीही म‍िळालेली आहे.

सिंधुताईंच्या आयुष्याची कहाणी संघर्षमय -

सिंधुताईंच्या आयुष्याची कहाणी संघर्षमय असली, तरी प्रेरक आहे. कोवळ्या वयातील विवाह, त्यानंतर मुलांचा जन्म, मुलांना वाढवितानाच करावे लागणारे काबाडकष्ट, घरात आणि दारात होणारी उपेक्षा. पन्नास-साठच्या दशकात भारतातील बहुतेक महिलांची कहाणी अशीच असे. वर्धा जिल्ह्यातील नवरगाव येथे जन्मलेल्या सिंधुताईंची कथा सुरुवातीला याहून वेगळी नाही; परंतु त्यांनी अन्यायाला वाचा फोडली. शेण काढणाऱ्या महिलांना मजुरी मिळत नसल्याबद्दल त्यांनी आवाज उठविला.

Last Updated : Jan 5, 2022, 12:05 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details