पुणे - ऑक्सफर्ड आणि पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून तयार करण्यात येत असलेल्या कोरोनावरील लसीच्या चाचण्या भारतात थांबवण्यात आलेल्या नाहीत. त्या सुरू असून आम्हाला आतापर्यंत काही अडचण आलेली नाही, असे स्पष्टीकरण सिरम इन्स्टिट्यूटकडून देण्यात आले आहे.
ऑक्सफर्ड आणि पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून तयार करण्यात येत असलेल्या कोरोनावरील लसीच्या चाचण्या जगात इतरत्रही घेण्यात येत आहेत. त्यात इंग्लडमध्ये सुरू असलेल्या चाचण्या थांबवण्यात आल्या आहेत. या ठिकाणी चाचणी घेण्यात येत असलेल्या एका स्वयंसेवकाची प्रकृती बिघडल्याने या चाचण्या थांबवण्यात आल्या आहेत.