पुणे : आपल्या वाडवडिलांमुळे आपली कीर्ती जगात आहे. आपले साम्राज्य हे राज्यकर्त्यांचे नाही तर ते धर्मसाम्राज्याचे आहे. सगळ्यांना जोडणारे सगळ्यांना उन्नत करणारे हे साम्राज्य आहे. सगळ्यांना मानवता शिकवणारे हे साम्राज्य आहे. ते साम्राज्य उभे करण्याची जबाबदारी भारतावर येऊ घातली आहे. वाट पाहतोय भारत कधी तयार होत त्याची आहे. आपल्याला जर तयार व्हायचं असेल तर त्याचा तंतोतंत उदाहरण छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्याकडून तयार झालेली इतिहासाची धारा आहे, असे मत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे.
पुण्यात मोहन भागवत यांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन : पुण्यात डॉ. केदार लिखित शिवछत्रपतींचा वारसा स्वराज्य ते साम्राज्य हा ग्रंथ आणि त्यांच्या इंग्रजी अनुवादाचे प्रकाशन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात जी लढाई होती तीच लढाई आज आहे. आजच्याही परिस्थितीत लढाई तीच आहे. दानवतेची मानवतेसोबत लढाई सुरू आहे. असुरांची-देवांची लढाई आहे.