महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुण्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ; आज १९२५ रुग्णांची नोंद

शहरात कोरोनाचा आकडा वाढताच आहे. १६ मार्चच्या आकडेवारीवरून हे दिसून येत असून १६ मार्चला मंगळवारी दिवसभरात तब्बल १९२५ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे.

Increase in the number of corona patients in Pune
पुण्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ

By

Published : Mar 16, 2021, 10:11 PM IST

पुणे - शहरात कोरोनाचा आकडा वाढताच आहे. १६ मार्चच्या आकडेवारीवरून हे दिसून येत असून १६ मार्चला मंगळवारी दिवसभरात तब्बल १९२५ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तसेच दिवसभरात ६७७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर ९ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला. यात २ रूग्ण पुण्याबाहेरील आहेत. सध्या पुणे शहरात ३९४ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या २ लाख २१ हजार २१० इतकी असून ॲक्टिव्ह रुग्णसंख्या १३ हजार २२५ इतकी आहे. आतापर्यंत एकूण मृत्यू ४९६९ इतके झाले आहेत. आजपर्यंत एकूण २ लाख ३०१६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज ८०४४ नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली.

पुणे विभागातील 6 लाख 13 हजार 53 कोरोना बाधित रुग्ण बरे-

दरम्यान पुणे विभागातील 6 लाख 13 हजार 53 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 6 लाख 55 हजार 871 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्णसंख्या 26 हजार 222 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 16 हजार 596 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.53 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 93.47 टक्के आहे.

पुणे जिल्हा-

पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 4 लाख 40 हजार 248 रुग्णांपैकी 4 लाख 8 हजार 770 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 22 हजार 142 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 336 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.12 टक्के इतके आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 92.85 टक्के आहे.

सातारा जिल्हा-

सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 60 हजार 853 रुग्णांपैकी 57 हजार 132 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 856 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 865 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 54 हजार 854 रुग्णांपैकी 51 हजार 442 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 375 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 769 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


सांगली जिल्हा-

सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 4 रुग्णांपैकी 46 हजार 860 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 321 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 769 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा-

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 50 हजार 912 रुग्णांपैकी 48 हजार 849 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 312 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 751 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा-अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला दहा वर्षाचा तुरुंगवास

ABOUT THE AUTHOR

...view details