पुणे -शहरात गेल्या महिन्याभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने, जैव वैद्यकीय कचऱ्यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. कोरोना रुग्णांचा वैद्यकीय कचरा प्रतिदिन सहा ते आठ टनावर पोहोचला आहे. इतर जैव वैद्यकीय कचरा धरून रोज शहरात तयार होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण आता अकरा ते बारा टन एवढे झाले आहे.
पुण्यात कोरोनाचा प्रसार सुरू झाला, त्यावेळी सुरुवातीला पीपीई किटबरोबरच रुग्णांच्या जेवणाचे, पाण्याचे ग्लास, उरलेले अन्नदेखील जैव वैद्यकीय कचऱ्यामध्ये पाठवले जात होते. त्यामुळे जून-जुलैद 2020 मध्ये हा कचरा 8 ते 10 टनापर्यंत पोहोचला होता. दरम्यान त्यानंतर सरकारने नियम बदल्यानंतर कोरोना रुग्णांच्या खाद्य पदार्थांशी संबंधित कचरा यातून वगळण्यात आला, त्यामुळे कचऱ्याचे प्रमाण कमी झाले होते.
कोरोना रुग्ण वाढल्याने जैव वैद्यकीय कचऱ्यात वाढ
ऑक्टोबरनंतर रुग्णांची संख्या कमी झाली, तसा कचराही कमी झाला होता. पण कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने जैव वैद्यकीय कचरा पुन्हा वाढला. शहरातील सर्व रुग्णालयांमध्ये वापरले जाणारे मास्क, पीपीई किट, वैद्यकीय उपचार केलेले साहित्य, तसेच गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांचा कचरा गोळा करण्यासाठी महापालिकेने मोठी यंत्रणा उभारली आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून हा कचरा गोळा केला जात आहे. कोरोनाशी संबंधित जैव वैद्यकीय कचरा एकत्र करून, तो तळोजा येथील मेडिकल वेस्ट ट्रिटमेंट सेंटरकडे पुढील प्रक्रियेसाठी पाठवला जातो. बंदिस्त वाहनाने ही वाहतूक केली जाते.
जैव वैद्यकीय कचऱ्यामध्ये वाढ कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नवीन प्रकल्पाचे काम सुरू
काही महिन्यांपूर्वी कचरा दोन ते तीन हजार किलोने कमी झाला होता. रुग्ण वाढल्याने कचरा पुन्हा वाढला आहे. रोजच्या जैव वैद्यकीय कचऱ्यापेक्षा या कचऱ्याचे प्रमाण अधिक आहे. या कचऱ्याचे नियोजन करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना आम्ही सुरक्षेचा उपाय म्हणून कोविडची लस दिली आहे. पुण्यातील कचरा विल्हेवाट प्रकल्पाची क्षमता कमी असल्याने, नॉन कोविड कचरा तळोजाला पाठवला जातो. नियमित जैव वैद्यकीय कचऱ्यावर येरवड्यातील प्रकल्पामध्ये प्रक्रिया होते. नवीन प्रकल्पाचे काम सुरू आहे, येत्या वर्षभरात तो कार्यान्वित होईल. अशी माहिती यावेळी वैद्यकीय अधिकारी मनिषा नाईक यांनी दिली.
हेही वाचा -राजकीय कामे सोडून जनतेची मदत करा; राहुल गांधींचे काँग्रेस पक्षाला आवाहन