मुंबई-परिवहन मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय असलेल्या संजय कदम ( IT raids on Sanjay Kadams house ) यांच्या घरी प्राप्तिकर विभागाची छापेमारी सुरुच आहे. 31 तास उलटून गेले तरी अनिल परब यांचे निकटवर्तीय असलेल्या संजय कदम यांच्या घरी छापेमारी सुरूच आहे. प्राप्तिकर विभागाच्या 4 टीम बुधवारी पहाटेपासून इथे महत्त्वपूर्ण कागदपत्र ( 4 IT teams at Mumbai ) गोळा करत आहेत.
अंधेरी पश्चिमेकडील अपना बाजारमधील स्वान लेक या ( Swan lake ) इमारतीतील 16 व्या मजल्यावर संजय कदम यांचे घर आहे. संजय कदम अनिल परब यांचे निकटवर्तीय आहेत. ते एक केबल व्यावसायिक आहेत. तसेच संजय कदम यांचे मावसभाऊ संजय साखळे यांच्या घरावरदेखील ( IT raids on Sanjay Sakhale home ) प्राप्तिकर विभागाकडून छापेमारी सुरुच आहे.
हेही वाचा-वेतन कपात हा खोडसाळपणा केवळ माथी भडकवण्यासाठी - मंत्री अनिल परब