महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अल्पदरातील कोविड सेंटरचे उद्घाटन - मोफत लसीकरण

वाघोलीमध्ये जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आलेल्या अल्पदरातील कोविड सेंटरचे उद्घाटन शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

कोविड सेंटरचे उद्घाटन
कोविड सेंटरचे उद्घाटन

By

Published : May 3, 2021, 10:45 PM IST

पुणे - वाघोलीमध्ये जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आलेल्या अल्पदरातील कोविड सेंटरचे उद्घाटन शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड्ससह व्हेंटिलेटर बेड रुग्णांना अल्पदरात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना याचा नक्कीच फायदा होणार आहे.

अल्पदरातील कोविड सेंटरचे उद्घाटन

यावेळी शिरूर-हवेलीचे आमदार यांनी शिरूर हवेली मतदार संघातील कोरोना परिस्थिती आणि त्यावर करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. विशेष करून कोरोनायोद्धा म्हणून पत्रकार सुरेश वांढेकर यांचा सन्मान अशोक पवार यांच्या हस्ते शाल-श्रीफळ देऊन करण्यात आला. प्रसंगी आमदार अशोक पवार, रामदास दाभाडे, माणिकराव सातव, राजेंद्र सातव, बाळासाहेब सातव, रामकृष्ण सातव, सुधीर भाडळे, सागर जाधव ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा -राज्यात सोमवारी 48 हजार 621 कोरोनाबाधितांची नोंद, 567 जणांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details