महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ऐन श्रावण महिन्यात भीमाशंकर परिसरात विजेचा लपंडाव, महावितरणचा भोंगळ कारभार

भीमाशंकर परिसरात महावितरणाच्या विजेची गरज असतानाही दिवस-रात्र विजेचा लपंडाव सुरू आहे. याबाबत महावितरणला वेळोवेळी तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

By

Published : Aug 4, 2019, 8:37 AM IST

भिमाशंकर

पुणे- श्रावण मासात बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या भीमाशंकर येथे देशभरातून लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. मात्र भीमाशंकर परिसरात महावितरणाच्या विजेचा लपंडाव अनेक दिवसांपासून सुरू असल्याने भाविक भक्तांसह स्थानिक नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबतची तक्रार भीमाशंकर देवस्थानच्या विश्वस्तांनी महावितरणाकडे करून देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

भिमाशंकर परिसरात महावितरणाच्या विजेचा लपंडाव

सध्या भीमाशंकर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. तसेच भीमाशंकर परिसरात पांढऱ्याशुभ्र धुक्‍याने संपूर्ण परिसर वेढला गेला आहे. त्यामुळे या परिसरात विजेची गरज असतानाही दिवस-रात्र विजेचा लपंडाव सुरू आहे. याबाबत महावितरणला वेळोवेळी तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

भीमाशंकर येथे वीस-पंचवीस वर्षांपूर्वीची महावितरणाची लाईन आहे. सध्या ही लाईटची लाईन जीर्ण होत चालली असून त्यामध्ये वारंवार बिघाड होत आहे. त्यामुळे विजेचा लपंडाव सुरु असून सध्याच्या पावसामुळे लाईटच्या दुरुस्तीलाही विलंब लागत आहे. त्यामुळे भीमाशंकर परिसरात नव्याने लाईन टाकून कायम स्वरूपी लाईट देण्यात यावी, अशी मागणी सध्या होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details