पुणे -कोंढव्यातील अल्कोन स्टायलश या सोसायटीची संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १५ बांधकाम मजुरांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी ३ आरोपींना तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. तिघांनाही मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा मिळाला असून पुढील सुनावणी ३० जुलैला होणार आहे.
कोंढवा दुर्घटनेतील तिघांना तात्पुरता अटकपूर्व जामीन - pune police
कांचन डेव्हलपर्सचा मालक पंकज व्होरा आणि भागीदार सुरेश शहा व रश्मिकांत गांधी या आरोपींना जामीन मंजूर झाला आहे. पुढील सुनावणी ३० जुलैला होणार आहे.
कोंढवा दुर्घटना
कांचन डेव्हलपर्सचा मालक पंकज व्होरा, भागीदार सुरेश शहा आणि रश्मिकांत गांधी या आरोपींना जामीन मंजूर झाला आहे. याआधी अल्काॅन बिल्डरच्या दोघांना अटक झालेली आहे. अल्कोन स्टायलश सोसायटीची इमारत बांधणाऱ्या विकासक विवेक अग्रवाल आणि विपुल अग्रवाल, अशी त्यांची नावे आहेत. दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत.