पुणे - राज्य सरकारकडून पालकमंत्री नेमण्याबाबत मोठ्या प्रमाणात उशीर होत आहेत, असे म्हणत यांच्यामध्ये मतभेद असल्यामुळे हा उशीर होत आहे अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे. तसेच राज्य शासन हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाणून-बुजून पुढे नेत असून त्यांना आपण केलेले काम हे जनता विसरून जाईल. परंतु, तसे नाही असीह पाटील म्हणाले आहेत.
सत्तर वर्षात भारतात चित्ते नव्हते, पंतप्रधानांच्या वाढदीवशी ते येण योगायोग; जयंत पाटलांची खोचक टीका - पंतप्रधानांना शुभेच्छा देताना जयंत पाटलांची टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, परंतु सत्तर वर्षात भारतात चित्ते नव्हते, आता भारतात ते आले हा योगायोग असे म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पुण्यातील साखर परिषदेमध्ये आज रविवार (दि. 18 सप्टेंबर)रोजी जयंत पाटील उपस्थित होते. त्या कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
Etv Bharat
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला भरपूर पाठिंबा मिळत आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सहभागी होणार का याबाबत चर्चा आणखी झालेली नाही. तसेच, महाराष्ट्रात आलेली नाही. त्यावर नंतर निर्णय घेतला जाईल. दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या सभेला मिळणारा वाढता पाठिंबा आणि बंडखोर आमदाराने शिवसेना सोडल्यानंतर ज्या प्रतिक्रिया लोकांमधून येत आहेत ते पाहता सरकार घाबरलेले आहे असही पाटील म्हणाले आहेत.