पुणे -कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य शासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. दुकान, हॉटेलच्या वेळा वाढविल्या आहेत. पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व व्यापारी दुकाने रात्री 11 वाजेपर्यंत, तर हॉटेल, रेस्टॉरेंट, बार, फुड कोर्ट सर्व दिवस रात्री 12 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काढले आहेत.
हेही वाचा -रिपब्लिकन पक्षाच्यावतीने विविध मागण्यांकरता पुण्यात आंदोलन
कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. तिसरी लाट आली नसल्याने रुगणसंख्येत घट झाली आहे. त्यामुळे, राज्य शासनाकडून निर्बंध शिथिल केले जात आहेत. आता दुकानांच्या वेळाही वाढविल्या आहेत. पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व व्यापारी आजपासून दुकाने रात्री 11 वाजेपर्यंत, तर हॉटेल, रेस्टॉरेंट, बार, फुड कोर्ट सर्व दिवस रात्री 12 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. महापालिका क्षेत्रातील अम्युझमेंट पार्क, संग्रहालय, इंडस्ट्रीज शुक्रवारपासून सुरू होतील. यामध्ये फक्त मोकळ्या जागेतील कोरड्या राईडसाठी परवानगी राहील, पाण्यातील राईडसाठी मनाई आहे. हे आदेश पुणे, खडकी कटक मंडळालाही लागू राहणार आहेत.
...असे आहे आदेश
१) पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यापारी दुकाने ही सर्व दिवस रात्री ११.०० वाजेपर्यंत सुरू राहतील.