महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Girls Birth Ratio in Pune : पुण्यात दरहजार मुलांमागे फक्त 900 मुली, मुलींच्या जन्मदरात लक्षणीय घट - Girls Birth Ratio in Pune

पुण्यामध्ये 2014 पर्यंत स्त्री-पुरुष जन्मदरात प्रगती होत असल्याचं चित्र होतं. 2015 मध्ये हा आकडा 1000 मुलांमागे 891 मुलींचा जन्मावर (Birth rate of girls) आला. आणि 2016 मध्ये 53 टक्क्यांनी घसरुन 1000 मुलांमागे 838 मुलींचा जन्मदर झाला.

pune mnc
pune mnc

By

Published : Dec 13, 2021, 3:24 PM IST

पुणे : विद्याचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात मुलींचा जन्मदर घटत (Decline in the birth rate of girls) आहे. सन 2020 मध्ये शहरात 1 हजार मुलांमागे 946 मुली होत्या. मात्र, अवघ्या वर्षभरातच हे प्रमाण लक्षणीय घसरले असून, ऑक्टोबर 2021 अखेर शहरात हे प्रमाण प्रतिहजारी 46 ने कमी होऊन 900 वर आले आहे.

स्त्री-पुरुष जन्मदर
नागरी नोंदणी प्रणालीवर आधारित या अहवालानुसार पुण्यामध्ये 2014 पर्यंत स्त्री-पुरुष जन्मदरात प्रगती होत असल्याचं चित्र होतं. 2015 मध्ये हा आकडा 1000 मुलांमागे 891 मुलींचा जन्मावर आला. आणि 2016 मध्ये 53 टक्क्यांनी घसरुन 1000 मुलांमागे 838 मुलींचा जन्मदर झाला. त्यामुळे 2010 मध्ये पुणे शहरातील मुलींच्या जन्माचे प्रमाण 879 होते. 2020 ला हे प्रमाण 946 पर्यंत आले होते. मात्र 2021 मध्ये हे प्रमाण 900 वर आले आहे.

गर्भलिंग निदान चाचणी कायद्याच्या अंमलबजावणीची गरज
देशात स्त्रीभ्रुण हत्येमुळे राज्यभरात गर्भलिंग निदान चाचणी कायद्यानुसार बंदी आणली गेली. परंतु, गर्भलिंग निदान चाचणी कायद्यावर बंदी असतानाही मुलींच्या जन्मदरात जर घट होत असेल, तर पुण्यात गर्भलिंग निदान चाचणी कायद्याची कठोर अंमलबजावणी होते की नाही, हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे.

जन्मदर वाढविण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न
शहरात गेल्या दहा वर्षापासून मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी पालिकेकडून विशेष प्रयत्न करण्यात आले. त्याअंतर्गत वस्तीपातळीवर जाऊन जनजागृती, बेकायदेशीर गर्भपात केंद्रावर कारवाई, गर्भपात केंद्रांची वारंवार तपासणी, गर्भलिंग निदान कायद्याची कडक अंमलबजावणी, त्यासाठी विशेष पथकांद्वारे तपासणी असे विविध उपाय राबविण्यास महापालिकेने सुरूवात केली आहे, अशी माहिती महापालिका आरोग्य प्रमुख आशिष भरती यांनी दिली.

वर्ष प्रति हजार मुलांमागे मुली

वर्ष - मुलींचा जन्मदर
2010 - 879
2011 - 884
2012 - 934
2013 - 933
2014 - 937
2019 - 922
2020 - 946
2021- 900 ( ऑक्टोबर 2021 पर्यंत )

हेही वाचा -Mumbai High Court relief to actress Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना रनौतला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

ABOUT THE AUTHOR

...view details