महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुण्यात डिझेल 100 पार, तर पेट्रोलने 111चा टप्पा ओलांडला; ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट - etv bharat marathi

पुण्यात काही दिवसांपूर्वीच पेट्रोलने प्रति लिटर शंभरी पार केली असताना आता डिझेलने ही प्रति लिटर शंभरी पार केली आहे. वाढत्या इंधन दरांमुळे पुणेकरांच्या खिशावरील भार वाढल्याने सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया येत आहे. सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा मोठा फटका बसत आहे. याबाबत आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी-

पुण्यात डिझेल 100 पार, तर पेट्रोल 111चा टप्पा ओलांडला; ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट
पुण्यात डिझेल 100 पार, तर पेट्रोल 111चा टप्पा ओलांडला; ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट

By

Published : Oct 17, 2021, 2:17 PM IST

पुणे - पुण्यात काही दिवसांपूर्वीच पेट्रोलने प्रति लिटर शंभरी पार केली असताना आता डिझेलने ही प्रति लिटर शंभरी पार केली आहे. वाढत्या इंधन दरांमुळे पुणेकरांच्या खिशावरील भार वाढल्याने सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया येत आहे. सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा मोठा फटका बसत आहे.

सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा मोठा फटका बसत आहे. याबाबत पुण्यामध्ये आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी-

सर्वसामान्य मोठा फटका

गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्यावतीने पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षात आणण्याचा विचार सुरू असताना कुठेतरी सर्वसामान्य नागरिकांना याचा फायदा होईल अशी परिस्थिती असताना अश्या पद्धतीने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे. एकीकडे 2800 रुपयात पेट्रोल माझ्या गाडीत लागत असताना आज 4000 ते 4500 रुपयांचा पेट्रोल गाडीत बसत असल्याने मोठा फटका याचा बसत आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी एका वाहन चालकाने दिली.

डिझेल शंभरी पार

आज पुणे शहरात पेट्रोल 111.25 रुपये प्रतिलिटर तर पॉवर पेट्रोल 114.95 प्रतिलिटर आणि डिझेल 100.45 रुपये प्रतिलिटर आहे. काही दिवसांपूर्वीच पेट्रोलने शंभरी पार केल्यानंतर आत्ता डिझेलने ही पुण्यात 100 री पार केली आहे.

हेही वाचा -...अब किसके नसीब से महंगाई बढ रही है! राष्ट्रवादीचा पंतप्रधानांना टोला

ABOUT THE AUTHOR

...view details